Chana Disease Agrowon
ताज्या बातम्या

Chana Disease : बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे अडीच एकरांतील हरभरा पीक मोडले

हरभऱ्याच्या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने काहींना मोठा फटका बसला.

Team Agrowon

दानापूर, जि. अकोला ः तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात मागील काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण (Cloudy Weather) राहिल्याने पिकांवर परिणाम झाला. हरभऱ्याच्या पिकावर (Chana Crop) बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव (Chana Fungal Disease) झाल्याने काहींना मोठा फटका बसला.

येथील सुभाष रौंदळे या शेतकऱ्याने अडीच एकरातील हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व मोठ्या प्रमाणात धुक्यामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. बुरशीजन्य रोग वाढले. हरभरा पीक फुलोरावस्थेत येण्याच्या आधीच पिकात मर रोग वाढला.

ठिकठिकाणी खाडे पडले. त्यामुळे उत्पादन येण्याची शक्यता नसल्याचे पाहून रौंदळे यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक हेक्टरमधील पेरणीसाठी बियाणे, खत, पेरणी, मशागतीवर मोठा खर्च केलेला आहे.

मी अडीच एकरांत हरभऱ्याची लागवड केली होती. गेले काही दिवस सतत ढगाळ वातावरण, धुके पडत आहे. यामुळे पिकावर परिणाम झाला. अळी, बुरशीचाही कहर झाला. पिकात मर वाढला. कीडनाशक, बुरशीनाशकाची फवारणीही केली. पण फारसा फायदा होऊ शकला नाही. हे लक्षात घेता उत्पादनाची हमी नसल्याने ट्रॅक्टर फिरवावा लागला.
सुभाष रौंदळे, शेतकरी, दानापूर, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT