Onion  Agrowon
ताज्या बातम्या

Onion : कांद्राप्रश्‍नी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

शेतकरी नेते राजू शेट्टी यांची केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांकडे मागणी

टीम ॲग्रोवन

नाशिक : ‘‘नाफेड’ने कांदा विक्री (NAFRD Onion Sale) बंद करून खरेदी सुरू करावी, जेणेकरून त्यात स्थिरता येईल. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Producer Farmer) दिलासा द्यावा,’’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे केली.

शेट्टी यांनी दिलेल्या पत्रानुसार, देशातील सर्वाधिक कांदा हा बांगलादेश आणि श्रीलंकामध्ये निर्यात होत होता. विशेषतः: बांगलादेश भारताच्या एकूण कांद्याच्या निर्यातीच्या ६० टक्के कांदा खरेदी करत होता. परंतु केंद्र सरकारचे आयात-निर्यातीचे लहरी धोरण, अचानक निर्यात बंदी लावणे यासारख्या प्रकारास कंटाळून बांगलादेशने भारतीय कांद्याच्या आयातीस वेगवेगळे निर्बंध लावून भारताचा कांदा आयात होणार नाही, याची दक्षता घेतली.

इराककडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला. आपण एक हक्काची बाजारपेठ गमावून बसलो आहोत. श्रीलंकेतील अंतर्गत यादवीमुळे तिथेही निर्यात बंद आहे. तशातच नाफेडने कांदा खरेदी बंद करून आपलाच खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारात विकायला सुरू केली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव धडाधड कोसळत आहेत.

बांगलादेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अडथळे आणावेत

केंद्र सरकारने आता खडबडून झोपेतून जागे व्हावे आणि नाफेडचा कांदा विक्री बंद करून कांदा खरेदी सुरू करावी. अजून अडीच लाख टन कांदा खरेदी करावा. बांगलादेश जर आमचा कांदा घेणार नसेल तर तेथून आयात होणाऱ्या कापड आणि तयार कपड्यांच्या आयातीत अडथळे निर्माण करावेत. तरच कांदा उत्पादकांना न्याय मिळेल, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IMD Rain Predication : ऑगस्ट महिन्यात राज्यात कमी पाऊस होणार; हवामान विभागाचा अंदाज

Agrowon Podcast : सोयाबीनचे दर टिकून; आजचे ज्वारी बाजार, ज्वारी दर, बेदाणा भाव, ढोबळी मिरची रेट

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानातील ९५ कामांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित

Automation In Farming: खते, पाणी बचतीसाठी ऑटोमेशनवर भर 

Nagpur Heavy Rain: नागपुरात अतिवृष्टीमुळे ७,४३० हेक्टरवर नुकसान

SCROLL FOR NEXT