Team Agrowon
राज्य कांदा (Onion) उत्पादक शेतकरी संघटनेसह राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही गेल्या काही महिन्यांत रास्ता रोको, मोर्चे, आंदोलने केले आहे.
वेळोवेळी राज्य आणि केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. त्याचबरोबर कांदा परिषदेच्या माध्यमातून घसरलेल्या कांदा दराप्रश्नी आवाज उठवून पाठपुरावा केला आहे. मात्र तरीसुध्दा कांद्याच्या दरात वाढ करण्यासाठी सरकारकडून कोणतेही पावले उचलली गेली नाहीत.
कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो २० ते २२ रुपये येतो. मात्र कांद्याला सरासरी ८ ते १० रुपये इतका कमी दर मिळत आहे.
राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात सरासरी २५ रुपये प्रति किलोचा दर द्यावा.
अन्यथा, १६ ऑगस्टपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला.
एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत मातीमोल भाव मिळत असताना या वर्षी नाफेडकडून अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला.
परंतु नाफेडनेही शेतकऱ्यांचा कांदा १० ते १२ रुपये प्रतिकिलोप्रमाणे खरेदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.