सचिन गुरव
सिद्धटेक, ता. कर्जत, जि. नगर : कुस्तीचा आखाडा (Wrestling Arena) गाजवला, मानाच्या गदा, विविध पारितोषिके आणि नावलौकिकही मिळवला. मात्र कुस्तीतील आखाड्यातच दुखापत झाली आणि कुस्तीपासून दूर जावे लागले.
हे शल्य कायम बोचणारे. अशा परिस्थिती घरात लेकीचे आगमन (Girl Birth Celebration) झाले आणि कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
आता अधुरे स्वप्न पूर्ण होणार अशी आशा ठेवून लेकीचे स्वागत केले ते कुस्तीमध्ये मिळालेल्या बक्षिसे, गदांच्या पूजनाने. कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील संग्राम कायगुडे यांच्या इच्छाशक्तीचे सगळीकडेच कौतुक होत आहे.
गणेशवाडी (ता. कर्जत) येथील साधारण, शेतकरी कुटुंबातील संग्राम कायगुडे यांना शालेय जीवनापासून कुस्तीची आवड. त्यांनी मोठमोठे मैदान गाजवले.
तालुका, जिल्हा तसेच विभागीय पातळीवरही चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्र केसरीसाठी झालेल्या जिल्हा निवड चाचणीतही बाजी मारत ट्रॉफी मिळवली.
त्याशिवाय ‘गोल्ड मेडल’ही जिंकले. पुढे जाऊन महाराष्ट्र केसरीसारखे मोठाले किताब जिंकण्याचीही त्याची ऊर्मी, जिद्द होती. परंतु दुर्दैवाने एका कुस्तीमध्ये अपघाताने हाताला दुखापत झाली आणि होत्याचे नव्हते झाले. कुस्ती थांबवावी लागली.
दरम्यान, कायगुडे दांपत्याला ‘शौर्या’ हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता. मुलगा-मुलगी भेदभाव न करता सर्वांनी तिचे स्वागत केले.
नुकतेच या मुलीच्या ‘पाचवी’ला मानाच्या गदा, सुवर्ण पदक आणि ट्रॉफी तिच्याजवळ ठेवून पूजा केली. आता लेकीला पहिलवान करण्याचा संकल्प करत तिचे स्वागत केलेल्या संग्राम यांचे कुस्तीक्षेत्रातून कौतुक होत आहे.
कुस्ती या खेळप्रकारात मुलींचा टक्का फारच कमी आहे. मात्र आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जतसारख्या विकसनशील भागात आंतरराज्य कुस्ती स्पर्धा आणि त्याही केवळ मुलींसाठी असणे, ही बाब भविष्यात मुलींचे कुस्तीतील स्थान मजबूत करेल.
- संग्राम कायगुडे, गणेशवाडी, ता. कर्जत, जि. नगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.