Sugarcane Seeds Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Cultivation : ऊस बेणे विक्रीसाठी उपलब्ध

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असेलेल्या कोल्हापूर येथील शाहू कृषी तंत्र विद्यालयात ऊस बेणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

Team Agrowon

लांबलेल्या पावसामुळे यंदा पूर्व हंगामी ऊस लागवडीचा (Sugarcane Cultivation) हंगामही लांबलेला आहे. पूर्व हंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान होते. परंतु या काळात वाफसा नसल्यामुळे वेळेवर ऊस लागवड झाली नाही. सध्या बऱ्याच ठिकाणी ऊस लागवड सुरु आहे. उसाच्या चांगल्या उत्पादनासाठी बेणे निवड महत्वाची आहे. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्याची टिपरी वापरुन करावी. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बेणे प्रक्रिया करुनच ऊसाची लागवड करावी. पुर्व हंगामी ऊस लागवडीसाठी फुले - २६५, को ८६०३२, को ९४०१२, को ९२००५, को ८०१४ यापैकी जातींची निवड करावी. यासाठी बेणे खात्रिशिर ठिकाणाहूनच खरेदी करणे गरजेचे आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असेलेल्या कोल्हापूर येथील शाहू कृषी तंत्र विद्यालयात ऊस बेणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यात उसाचे को - ८६०३२, फुले - ०२६५ आणि एम. एस. - १०००१ या जातीच्या मुलभूत बियाण्यांचा (ब्रिडर सीड) समावेश आहे. प्रति दोन डोळा १००० कांड्यांचा दर १६०० रुपये असून ऊस बियाणे तोडणी व भरणी स्वतः करावी लागेल.

पत्ता - महासैनिक दरबार हॉल समोर, लाईन बाझार, कसबा बावडा, कोल्हापूर

संपर्क -

एस. टी. कांबळे (कृषी सहाय्यक) - ९२८४४०६२६२ किंवा ९४२१७५८३६५

एस. एस. नेवरे (कनिष्ठ संशोधन सहाय्यक) - ९४०५२३७३७३

डॉ. के. व्ही. गुरव (प्राचार्य) - ९४२३८१६५८९ किंवा ९६७३०८३०७२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

Crop Insurance: पीकविमा परतावा मंजुरीत लोहा, कंधारला ठेंगा

Cultural Heritage: छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी असेल; राम शिंदे

Wild Vegetables: रानभाज्यांना मिळाली बाजारपेठ

Artificial Sand: कृत्रिम वाळू धोरणासाठी जिल्ह्यात आराखडा तयार

SCROLL FOR NEXT