Canel Water Agrowon
ताज्या बातम्या

Canal Water : शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळणार

संबंधित खात्याने होणाऱ्या खर्चाला मंजुरी देणे व त्यानंतर कालव्याला पाणी सोडले जाते, असा शासकीय नियम आहे.

टीम ॲग्रोवन

रोहा ः स्थानिक शेतकऱ्यांनी पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे (Irrigation Department) लेखी प्रस्ताव पाठविणे, त्‍या अनुषंगाने संबंधित खात्याने होणाऱ्या खर्चाला मंजुरी देणे व त्यानंतर कालव्याला पाणी सोडले जाते, असा शासकीय नियम (Government Law) आहे.

मात्र या वर्षी शेतकऱ्यांकडून निवेदन आले नाहीत. तरीही लोकहितासाठी शासनाकडून लागणारा निधी मंजूर करून उन्हाळ्यात कालव्याला पाणी सोडणार, असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

आठ ते १० वर्षे कुंडलिका नदीच्या दोन्ही तिरावरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे हाल व नुकसान झाल्यामुळे वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी भागातील शेकडो ग्रामस्थांनी उठाव केला,

तर भाजपने उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुतारवाडी येथे ग्रामस्थ व प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली. आमदार अनिकेत तटकरे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता दीपेश्री राजभोग,

तहसीलदार कविता जाधव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर आदी मान्यवर उपस्थिती होते.

कालव्याला पाणी सोडण्यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांनी लेखी अर्ज अथवा निवेदन देणे गरजेचे आहे. मागणीनुसार, शासन या कामासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करते. लेखी स्वरूपात मागणी केली तर त्यांची दखल घेतली जाईल.

- दीपेश्री राजभोग, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT