Fertilizer  Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Fertilizer : सांगलीत बनावट औषधे, खते विक्रीविरोधात मोहीम

सांगली ः जिल्ह्यात बनावट औषध, खत विक्रीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू आहे. कृषी विभागाने ८३ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद, २५ कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द केला.

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात बनावट औषध, खत (Bogus Fertilizer) विक्रीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू आहे. कृषी विभागाने (Agriculture Department) ८३ कृषी सेवा केंद्रांना (Krushi Seva Kendra) विक्री बंद, २५ कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द केला. नियमित तपासण्यांसह कारवाईत सातत्य ठेवावे लागणार आहे. बनावट औषधे, कीटकनाशकांमुळे (Pesticide) शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

कृषी विभागाने गेल्या तीन ते चार महिन्यात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशे विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यात गुणनियंत्रण निरीक्षकांनी बियाणांचे ९९ टक्के, खताचे ९१ टक्के व कीटकनाशकांचे ८४ टक्के नमुने काढून विश्लेषणासाठी सादर केले होते.

त्यात अप्रमाणित नमुन्यांबाबत चालू वर्षी बियाणे २०, खते १३, कीटकनाशके १ याप्रमाणे खटले दाखल केले. जिल्ह्यामध्ये ८३ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश दिले असून २५ कृषी केंद्रांचा परवाना रद्द केला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी विनापरवाना कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या

Agriculture Innovation: ‘एचटीबीटी’ला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करा

Farmer Protest: कर्जमुक्त होईपर्यंत शेतकरी घर, शेतांवर लावणार काळे झेंडे

Karul Ghat Landslide: मुसळधारेमुळे करूळ घाटात दरड कोसळली

Farm Roads: शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक

SCROLL FOR NEXT