BRS march Agrowon
ताज्या बातम्या

BRS March : केंद्रेकर यांचा अहवाल‌ लागू करण्यासाठी ‘बीआरएस’चा मोर्चा

Farmer Suicide : शेतकऱ्यांचा आत्महत्या थांबवण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी राज्य शासनाने अहवाल सादर केला होता. तोअहवाल तत्काळ लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी भारत राष्ट्र समितीतर्फे परभणीत मोर्चा काढला.

Team Agrowon

Parbhani News : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तेलंगणा मॉडेलच्या धर्तीवर माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनास सादर केलेला अहवाल तत्काळ लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी भारत राष्ट्र समितीतर्फे (बीआरएस) मंगळवारी (ता. २२) परभणी येथील शनिवार बाजार मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला.

तेलंगणा मॉडलच्या धरतीवर शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी १० हजार रुपये शेतीसाठी २४ तास योग्य दाबाची मोफत वीज द्यावी. शेतीसाठी बारमाही पाण्याची सोय करावी. शेतकऱ्यांना ५ लाख रुपये विमा संरक्षण द्यावे. कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी मूळ मालकांना परत‌ द्याव्यात. परभणी जिल्ह्यात पावसाचा २१ दिवसांचा खंड पडल्यामुळे अग्रिम पीकविमा परतावा द्यावा. तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.

तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा द्याव्यात आदी मागण्यांसाठी प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. ‌शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahrashtra Summer Weather: उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचा इशारा

Agricultrure Funding: मंजुरीपेक्षा जास्त निधी देत केंद्राचा सुखद धक्का

Sugar Industry: साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Ice Apple Demand: उन्हामुळे ताडगोळ्यांना मोठी मागणी

Beetroot Farming: वाणगावच्या बीटचा दिल्लीत गोडवा

SCROLL FOR NEXT