Hapus Mango Market
Hapus Mango Market Agrowon
ताज्या बातम्या

Mango Research Center : राष्ट्रीय संशोधन केंद्राची शाखा रत्नागिरीमध्ये व्हावी

Team Agrowon

Ratnagiri News : हापूसवरील किड रोगांवर नियंत्रण ठेवणारी प्रभावी कीटकनाशके उपलब्ध व्हावीत यासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्राची शाखा रत्नागिरीमध्ये व्हावी यासाठी येथील आंबा बागायतदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालणार आहेत. मुख्यमंत्री गुरुवारी (ता. २५) रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी भेट घेण्याचा प्रयत्न बागायतदार करणार आहेत.

वातावरणातील बदलांमुळे यंदा हापूसचे पीक अल्प होते. सध्या शेवटच्या टप्प्यातील हंगाम सुरू आहे. पुढील आठ दिवसांत हंगामाची अखेर होईल, असे बागायतदारांनी सांगितले. थ्रिप्स रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना महागडी कीटकनाशके वापरावी लागली. काही बागायतदारांना त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे ऐन हंगामात हापूस डागाळला होता.

तो बाजारात पाठवणे शक्य नसल्याने कॅनिंगशिवाय पर्याय नव्हता. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे पेटीचे दर उच्चांकी होते. कॅनिंगसाठीही आंबा कमी उपलब्ध होता. थ्रिप्ससह अन्य रोगांना आळा घालण्यासाठी आवश्यक संशोधन होणे गरजेचे आहे.

त्यासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्राची शाखा रत्नागिरीत सुरू करणे आवश्यक आहे. सध्या आंब्यावर वापरणारी कीटकनाशके ही अन्य पिकांसाठी वापरली जातात.

त्यादृष्टीने संशोधन झाले आहे. संशोधन केंद्राची शाखा सुरू करण्यासाठी केंद्रस्तरावर पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बागायतदार भेट घेणार आहे. दोन दिवसात पुन्हा आंबा बागायतदारांनी बैठक होणार आहे.

त्या वेळी विविध विषयांवर चर्चा केली जाणार असून मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधण्यात येणार आहे.

कर्नाटकी आंबा हापूसच्या नावाने विकणाऱ्यांवर कारवाईसाठीही शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी केली जाणार आहे. यंदा उत्पादन कमी आल्यामुळे बागायतदार कर्जात डुबणार आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

त्या विक्रेत्यांना बसला चाप

हापूसच्या नावाने कर्नाटकी आंबा विकणाऱ्या रत्नागिरीतील विक्रेत्यांना चाप लावण्यासाठी स्थानिक आंबा बागायतदारांनी राबवलेल्या धडक मोहिमेला काही प्रमाणात यश आले आहे. कर्नाटकमधून आंबा आणून तो रत्नागिरी हापूस नाव असलेल्या बॉक्समध्ये भरून पाठवत होते. या प्रकाराला आळा बसल्याचा विश्‍वास बागायतदार निशांत सावंत यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT