Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Baramati Agro : रोहित पवार यांच्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Rohit pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली होती. यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

Swapnil Shinde

Maharashtra Pollution board Notice : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली. कंपनीला ७२ तासांत प्लांट बंद करण्याचे नोटीस पाठविण्यात आल्याने रोहित पवारांना हा मोठा धक्का मानला जात होता. दरम्यान, या कारवाईला कंपनीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने ६ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीपर्यंत प्रदुषण मंडळाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे रोहित पवारांना दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली. रात्री २ वाजता या संबंधित नोटीस पाठवून बारामती ॲग्रो प्लांट ७२ तासांत बंद करण्याचे आदेश दिले होते. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत दोन नेत्यांच्या सांगण्यावरून हे घाणेरडे राजकारण सुरू असून या विरोधात लढत राहणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती.

कंपनीच्यावतीने प्रदुषण मंडळाच्या कारवाईला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याप्रकरणात ६ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत मंडळाच्या कारवाईवर स्थगिती देण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे रोहित पवार यांना तात्पुरता दिला मिळाल्याची चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT