Milk Union Elections  Agrowon
ताज्या बातम्या

Jalgaon Dairy Election : दूध संघावर भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व

अटीतटीसह प्रतिष्ठेची बनलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनेलने विजय मिळवला आहे. तर माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव : अटीतटीसह प्रतिष्ठेची बनलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (Jalgaon Dairy Election) भाजप शिंदे (BJP Shinde Camp) गटाच्या शेतकरी विकास पॅनेलने विजय मिळवला आहे. तर माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १०) मतदान झाले. मतमोजणी रविवारी (ता.११) जळगाव शहरात झाली. यात जिल्हा दूध संघावरील ‘खडसे राज’ संपुष्टात आले आहे

जिल्हा दूध संघ संचालक मंडळाची २०२२-२०२७ ची सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत २० संचालकांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सर्वसाधारण गटासह महिला राखीव, इतर मागास वर्गीय, अनुसूचित जाती जमाती, वि.जा.भ.ज. गटातून सर्वाधिक भाजप किंवा महाजन गटाचे ९, शिंदे गटाचे ५ असे शेतकरी विकास पॅनेलचे १४, तर आघाडीच्या प्रतिस्पर्धी सहकार पॅनेलचे ४ उमेदवार विजयी झाले. यापूर्वी पाचोरा मतदार संघात माजी आमदार दिलीप वाघ बिनविरोध निवडून आले होते.

१९ जागांसाठी मतदान पार पडले होते. वि.जा.भ.ज. गटात अरविंद देशमुख, अनुसूचित जाती गटातून आमदार संजय सावकारे, महिला राखीव गटात पूनम पाटील, छाया देवकर, इतर मागासवर्गीय गटात पराग मोरे, सर्वसाधारण गटातून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, संजय पवार, आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील आदी उमेदवार विजयी झाले.

पराभव दिसताच मतमोजणी केंद्रातून एक्झिट..

पहिल्या टप्प्यात महिला राखीव, अनुसूचित जाती, इतर मागास वर्गीय भ.जा.वि.ज. आदी उमेदवार आणि त्यानंतर सर्वसाधारण गट अशी दोन टप्प्यांत मतमोजणी झाली. दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणीदरम्यान मुक्ताईनगर मतदार संघातून मंदाकिनी खडसे यांचे मताधिक्य कमी झाले. पराभव अटळ असल्याचे दिसून येताच त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी, तसेच चोपडा मतदार संघातील सहकार पॅनेलच्या उमेदवार इंदिराबाई पाटील यांनीदेखील मतमोजणी कक्षातून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.

...यांचा झाला पराभव

पराभूत दिग्गज उमेदवारांमध्ये मंदाकिनी खडसे, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, शालिनी ढाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी संचालक डॉ. संजीव पाटील यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT