Canal Water Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Irrigation : ‘कडवा’, भोजापूर’मधून रब्बीसाठी आवर्तन

गतवर्षी १०५० दलघफू पाणी सोडण्यात आले होते. यंदा त्यापेक्षा तुलनेत १०० दलघफू पाणी कमी मिळणार आहे. सिन्नरच्या पूर्वभागातील ठराविक गावांतील शेतकऱ्यांनीच पाण्याची मागणी केली असून, आवर्तन सुटल्यावर काही प्रमाणात पाणी मागणी वाढेल, असा अंदाज आहे.

Team Agrowon

सिन्नर ः कडवा व भोजापूर कालव्यातून (Canal Water) यंदा रब्बीसोबत (Rabi Irrigation) बिगर सिंचनाचेही आवर्तन सोडण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्याने सिंचनासाठी ३०, तर बिगर सिंचनासाठी चार दिवसांचे, तर भोजापूरमधून १५ ते २० दिवसांचे सिंचनाचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

गतवर्षी १०५० दलघफू पाणी सोडण्यात आले होते. यंदा त्यापेक्षा तुलनेत १०० दलघफू पाणी कमी मिळणार आहे. सिन्नरच्या पूर्वभागातील ठराविक गावांतील शेतकऱ्यांनीच पाण्याची मागणी केली असून, आवर्तन सुटल्यावर काही प्रमाणात पाणी मागणी वाढेल, असा अंदाज आहे.

गेल्या वर्षी पाऊस खूपच कमी होता. त्यामुळे सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी मागणी झाली होती. यंदा मात्र १० ते १२ दिवसांत शेवटच्या पुतळेवाडीपर्यंत आवर्तन पोहोचेल, असा अंदाज आहे.

कडवा धरणात १६०० एमसेफ्टी जलसाठा आहे. त्यातून ९०२ एमसेफ्टी सिंचनासाठी राखीव आहे. एवढे पाणी ३० दिवसांच्या आवर्तनात ३५० क्युसेकने सोडले जाणार आहे. उर्वरित चार दिवसांत १२८ एमसेफ्टी पाणी बिगरसिंचनासाठी सोडले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT