Balasaheb Thorat Agrowon
ताज्या बातम्या

Bharat Jodo Yatra : ‘दांडी यात्रे’प्रमाणेच ‘भारत जोडो’ यात्रा ऐतिहासिक ः बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडी यात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार असल्याचे मत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नगर ः ः जाती-धर्मांच्या नावावर देशात राजकारण सुरू असून, वाढलेली महागाई, बेरोजगारी या विरुद्ध आवाज उठवत प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ही महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) नेतृत्वाखालील दांडी यात्रेप्रमाणे (Dandi Yatra) ऐतिहासिक ठरणार असल्याचे मत आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात असून, राज्यातील यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर असून, ते यात्रेचे समन्वयक आहेत.

यात्रेबाबत पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘भारत जोडो यात्रेमध्ये देशभरातील पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्र पक्षांचा मोठा पाठिंबा लाभत आहे. महाराष्ट्रात देगलूर येथे आगमन झाल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर यांना अभिवादन करून सुरू झालेल्या या यात्रेचे राज्यातील जनतेकडून अभूतपूर्व स्वागत झाले आहे. प्रेमाचा आणि एकतेचा संदेश देणारी यात्रा असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेप्रमाणे ही यात्रा ऐतिहासिक ठरणार आहे. दांडी यात्रेने देशात क्रांती केली. देश एक केला त्याचप्रमाणे भारत जोडो यात्रेतून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, देशहिताची व प्रेमाची ही ऊर्जा एक ऐतिहासिक चळवळ ठरणार आहे. या यात्रेमध्ये साहित्यिक, कवी, संपादक, लेखक यांच्यासह विविध घटकांतील लोक सहभागी होत आहेत.

नगरमधून मोठा सहभाग
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये राज्यभरातील विविध कार्यकर्त्यांसह नगर जिल्ह्यातून मोठा सहभाग आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, युवक नेते सत्यजित तांबे यांच्यासह अनेक युवकांनी यात्रेत सहभाग घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT