Manisha Khamkar Agrowon
ताज्या बातम्या

Young Agri Entrepreneur Award : मनीषा खामकर यांना सर्वोत्कृष्ट युवा कृषी उद्योजक पुरस्कार

बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) शेती आणि शेतकरी विकासात मोठे योगदान दिलेले आहे. काळानुरूप बदल करीत शेती, शेतकरी विकासाला आधुनिकतेच्या मार्गाने नेण्यासाठी संस्थेचा प्रयत्न महत्त्वाचा आहे.

टीम ॲग्रोवन

माळेगाव, जि. पुणे ः बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या (Agriculture Development Trust Baramati) कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) शेती आणि शेतकरी विकासात (Agriculture Development) मोठे योगदान दिलेले आहे. काळानुरूप बदल करीत शेती, शेतकरी विकासाला आधुनिकतेच्या मार्गाने नेण्यासाठी संस्थेचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. कृषी विज्ञान केंद्रामध्ये २०१९ मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या उद्योजिका सौ. मनीषा संजय खामकर (Manish Khamkar) यांना महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट युवा कृषी उद्योजक (Young Agri Entrepreneur Award) म्हणून बहुमान मिळाला आहे.

देशातील कृषी क्षेत्रातील उद्योजकांसाठी महत्त्वाची मानली जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट अर्थात ‘मॅनेज’ ही हैदराबादची सरकारी संस्था आहे. ही संस्था राष्ट्रीय स्तरावरील युवा कृषी उद्योजक जाहीर करते. त्यासाठी ही संस्था देशभरात त्यांनी जे उद्योजक घडवण्यासाठी सेंटर मंजूर केलेले आहेत, त्यामधील प्रशिक्षणाचा दर्जा व त्यानुसार घडलेले उद्योजक यांचे मूल्यांकन करते.

बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र हे त्यापैकी एक महत्त्वाचे नोडल सेंटर आहे. त्यानुसार २०१८ ते २०२२ दरम्यान ॲग्री-क्लिनिक्स आणि ॲग्री-बिझनेस सेंटर कृषी विज्ञान केंद्रातून यशस्वीरीत्या प्रशिक्षण घेतलेल्या सौ. मनिषा खामकर यांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कृषी उद्योजक म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दिल्लीतील ‘आयसीएआर’च्या कृषी विज्ञान भवनमध्ये (नॅशनल ॲग्रिकल्चरल सायन्स कॉम्प्लेक्स इंदरपुरी) हा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सौ. मनीषा खामकर त्या स्वतः कृषी कीटकनाशके व बी-बियाण्यांचे दुकान चालवतात. त्यांची वार्षिक उलाढाल एक कोटींहून अधिक आहे. स्वबळावर चालविलेले व ते यशस्वी केलेले हे एक केंद्र आहे. तसेच ते शेतकऱ्यांना सल्लाही देतात.

‘‘शेतकऱ्यांनी आधुनिक काळाबरोबर चालायला हवे. याच उद्देशाने अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सातत्याने नवनवीन प्रयोगांचा, आधुनिक मंत्र देत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे युवा कृषी उद्योजक पुरस्कार विजेत्या मनीषा खामकर होय,’’ अशा शब्दांत संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate: कांदा दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त

Agriculture Ministry: शेतकऱ्यांसाठी काम करायचे होते: कोकाटे

Monsoon 2025: जुलैअखेर मॉन्सून काठावर पास

Maharashtra Rain: पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता कायम

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

SCROLL FOR NEXT