Fig  Agrowon
ताज्या बातम्या

Fig And Sitafal Research Center : अंजीर आणि सीताफळ संशोधन केंद्रास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार

Fig Farming : अंजीर आणि सीताफळ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संशोधन व विस्तार कार्यासाठी उत्कृष्ट सादरीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Team Agrowon

Pune News : भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारा संचलित अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पाची २७ वी तीनदिवसीय वार्षिक आढावा बैठक बिकानेर (राजस्थान) येथील केंद्रीय कोरडवाहू फळपिके संशोधन संस्थेत आभासी पद्धतीने नुकतीच पार पडली.

या बैठकीत भारतातील एकूण १८ कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्प सहभागी झाले होते. या बैठकीवेळी अंजीर आणि सीताफळ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संशोधन व विस्तार कार्यासाठी उत्कृष्ट सादरीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या बैठकीचे उद्‌घाटन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या) डॉ. आनंद कुमार सिंह यांच्या हस्ते झाले.

उद्‌घाटन समारंभास भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक महासंचालक डॉ. व्ही. बी. पटेल, सीआईएसएचे संचालक डॉ. जगदीश राणे, अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दळवे, डॉ. युवराज बालगुडे, जाधववाडी येथील शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य देवराम काळे, दिलीप जाधव, सुनील जाधव, महेश खटाटे, समीर डोंबे, दीपक जगताप, कल्याण जगताप, मंगेश लवांडे व अतुल कडलग सहभागी झाले होते.

बैठकीत मान्यवरांच्या हस्ते केंद्रातील अंजीर आणि सीताफळ या पिकांच्या लागवड पुस्तिकांचे विमोचनदेखील आभासी पद्धतीने करण्यात आले. तीनदिवसीय बैठकीदरम्यान भारतातील सर्व कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञांनी २०२२-२३ या वर्षातील त्यांच्या अखत्यारीत असलेल्या कोरडवाहू फळपिकांतील संशोधनाचे सादरीकरण केले.

अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दळवे यांनी अंजीर व सीताफळ पिकांतील अन्नद्रव्य व्यवस्थापन, घन लागवड तंत्रज्ञान व काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, तर डॉ. युवराज बालगुडे यांनी अंजीर व सीताफळ पिकातील रोग-कीड नियंत्रण या विषयावर झालेल्या संशोधनाचे सादरीकरण केले.

या संशोधन व विस्तार कार्यासाठी शास्त्रज्ञांसह संशोधन केंद्रातील सुनील नाळे, नितीश घोडके व संदीप लिंभोरे यांनी योगदान दिले. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरांटीवार, विस्तार संचालक डॉ. चिदानंद पाटील, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. रवींद्र बनसोड याचे मार्गदर्शन लाभले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PMMSY Subsidy Scheme: मत्स्यपालनासाठी सरकार देतंय ६० टक्क्यांपर्यंत अनुदान; जाणून घ्या योजनेची 'A To Z' माहिती.

Tillage Implements: रब्बी हंगामाच्या मशागतीसाठी महत्त्वाचे यंत्र आणि अवजारे

Farmers Death : दोन महिन्यांत २ हजारहून अधिक शेतकरी आत्महत्या, पण राज्यकर्ते ढुंकून बघायला तयार नाहीत, शरद पवारांची जोरदार टीका

Agrowon Podcast: टोमॅटो दरात चढ उतार; कांदा दर दबावात, सोयाबीनचे दर कमीच, गवारला चांगला उठाव तर गव्हाचे भाव स्थिर

Agriculture Status: देशात पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणार! केंद्र सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT