Ajit Pawar
Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Crisis: एकनाथराव, काहीतरी काळेबेरे आहे सावध रहा

Team Agrowon

१०६ आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, ४० आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते, यात नक्की काहीतरी काळेबेरे आहे, अशी शंका उपस्थित करत राष्ट्रवादी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावध राहण्याचा सल्ला दिला.आघाडी सरकारमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची चर्चा होती. पण सर्वांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ती जबाबदारी घ्यावी लागली, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. यावेळी शिंदे यांचे अभिनंदन करताना पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी त्यांच्यावरील निधीबाबत दुजाभाव केल्याचा आरोप कसा निराधार आहे, हे स्पष्ट केले. याशिवाय शिंदे यांचे अभिनंदन करताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारावे लागलेल्या देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटे काढले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्यांच्याबरोबर गेले आहेत, त्या भाजपने (BJP) शिवसेनेची मदत घेऊन टप्प्या टप्प्याने पक्ष वाढवत नेला. १९८० साली भाजपचे १४ आमदार होते, १९९० साली १६ आमदार झाले, १९९५ साली ६५ झाले, २०१४ ला भाजपचे १२२ आमदार झाले. २०१९ ला १०५ आमदार निवडून आले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असे सांगत अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांना सावधानतेचा इशारा दिला.

राज्यपाल अॅक्शन मोडमध्ये
आज अनेक गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव घेण्याचे काही कारण होते का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. सदस्यांच्या अपात्रेचा ठराव न्यायप्रविष्ठ असताना ठराव आणण्याची घाई गरज नव्हती. असे काही तज्ज्ञदेखील बोलून दाखवतात. अनेक गोष्टी लांबणीवर टाकण्याचे काम राज्यपालांनी केले.

आम्ही सरकारमध्ये असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आम्ही अनेकदा राज्यपालांना (Governor) भेटायला जायचो, सर्व गेल्यानंतर मला आणि शिंदेंना राज्यपाल थांबवायचे, त्यानंतरही १२ आमदारांचा निर्णयही राज्यपालांनी दिला नाही. आता तर राज्यपाल एकदम अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत.

आमच्या काळात अनेक वेळा सांगूनही अध्यक्षपदाची निवड झाली नाही. आता अध्यक्षपदाची निवड ताबडतोब झाली. मागच्या चार दिवसात सर्व घटना इतका फास्ट पाहिला मिळाल्या, त्यामुळे जनतेच्या मनात शंका उपस्थित होते, विचार करतायत, असे का घडते आहे, गेल्या आठ ते दहा दिवसात राज्यात अनेक गोष्टी घडल्या. शिवसेनेचे (Shivsena) ४० आमदार शिंदे गटात सहभागी झाले. उद्धव ठाकरेंना पद सोडावे लागले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये काय मेसेज गेला याचाही अंदाज घ्या, असा सल्लाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला.

जेव्हा जेव्हा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला...
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Tahckeray) यांची शिवसेना जेव्हा जेव्हा फोडण्याचा प्रयत्न केला गेला, बाहेर पडले, त्यातला एकही आमदार नंतर निवडून आला नाही. छगन भूजबळ, नारायण राणे यांच्याबरोबर जितके आमदार बाहेर पडले, त्याचा आत्मचिंत झाले पाहिजे, याची आठवण अजित पवार (Ajit Pawar) यांनी करुन दिली.

बंडखोर आमदारांना टोला
गेल्या आठ दिवसात आपण बरेच काही बघितले.अनेक आमदारांना सूरतमध्ये (Surat) जायला मिळाले, सूरतवरुन गुवाहाटीला जायला मिळाले, गुवाहाटीवरुन गोव्याला जायला मिळाले, या आमदारांना आजपर्यंतच्या हयातीत इतके फिरायला मिळाले नसेल, असा टोलाही पवारांनी लगावला. त्यात आमचे शहाजीबापू काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, एकदम ओक्केमध्ये. शहाजीबापू ही मोठी लोकं कधी एकत्र येतील ते कळणार पण नाही. तुम्ही राहाल पाठीमागे, असा सल्ला अजित पवार (Ajit Pawar) यांनी शहाजीबापू पाटील यांना दिला.

अजित पवार यांनी वाचून दाखवली यादी
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत अनेकांनी राष्ट्रवादीने (NCP) आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. पण सर्वांना माहित आहे, मी काम करत असताना कधीच भेदभाव करत नाही. निधी देण्याबाबत आपण कसलाच दुजाभाव केलेला नाही. २८८ आमदारांना निधी मिळावा यासाठी आम्ही काम केले. नगरविकास खात्याला १२ हजार कोटींचा निधी दिला. आणखी निधी देण्याचे शिंदे यांना सांगितले होते.

गेल्या अडीच वर्षात शिंदे गटातील आमदारांच्या खात्याला किती निधी दिला होता? याची यादीच पवार यांनी वाचून दाखवली. शिवसेनेचेच (Shivsena) आमदार अशी टीका करतात असे नाही तर काँग्रेसमधले मातब्बर नेत्यांनीही अशी टीका केली आहे. उगाच वाद नको म्हणून आपण काहीही बोललो नाही. निष्कारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT