APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Chalisgaon APMC Result : चाळीसगाव बाजार समिती सभापतिपदासाठी चुरस

APMC Election : गेल्या महिन्यात बाजार समितीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या शेतकरी पॅनेलने १५ जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळवली.

Team Agrowon

Jalgaon News : गेल्या महिन्यात बाजार समितीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या शेतकरी पॅनेलने १५ जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळवली. त्यामुळे येत्या सोमवारी (ता. २२) होऊ घातलेल्या सभापतिपदाच्या निवडीसाठी कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

दरम्यान, स्व. रामराव जिभाऊ स्मृती शेतकरी पॅनेलचे सर्वेसर्वा, आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेकडे बाजार समितीच्या सभासद, शेतकरी व विद्यमान संचालकांचे लक्ष लागून आहे.

आमदार चव्हाण यांची पाच वर्षांत पाच सभापती करण्याची भूमिका असून, त्या दृष्टीने बाजार समितीमध्ये निवडून आलेल्या जुन्या व नव्या चेहऱ्यांपैकी प्रथम सभापतिपदी कोणाला संधी दिली जाते, या दृष्टीने विचारपूर्वक निर्णय घेतला जाणार आहे. सन २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तालुक्यात मते खेचणारा सभापती होणार असल्याची चर्चा आहे.

मात्र, १५ संचालकांमध्ये मच्छिंद्र राठोड (वलठाण), रवींद्र पाटील (उंबरखेड), किशोर पाटील (करंजगाव) हे तीन जुने संचालक पुन्हा विजयी झाले आहेत. तर नवीन चेहऱ्यांमध्ये प्रभाकर जाधव (चाळीसगाव), नवल पवार (दहिवद), कपिल पाटील (बहाळ), प्रदीप पाटील (डोणदिगर), रवींद्र पाटील (नांद्रे), राहुल पाटील (वाघडू), हेमराज पाटील (ब्राह्मणशेवगे), शैलेंद्रसिंग पाटील (शिदवाडी), साहेबराव राठोड (तळोदे प्र.चा.), नीलेश वाणी (उंबरखेड), प्रभाकर घुमरे (खरजई) आणि महिलांमध्ये वनिताबाई पाटील (कळमडू) यांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या आठ वर्षांपूर्वी (सन २०१५ मध्ये) झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचे पॅनेल विजयी झाले होते. तीच परंपरा आमदार चव्हाण यांनी सुरू ठेवली आणि गेल्या महिन्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या सहकार्याने १७ पैकी १५ उमेदवार विजयी करून आणले. त्यामध्ये एकमेव किंगमेकर आमदार चव्हाण ठरले.

गेल्या वेळी सभापतिपदासाठी चार पंचवार्षिक निवडून आलेले जुने व अनुभवी मच्छिंद्र राठोड यांची संधी हुकली आणि रवींद्र पाटील (उंबरखेड) यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सहकार्याने सभापती झाले होते.

त्यामुळे मच्छिंद्र राठोड यांना सभापती होण्याचा प्रथम मान मिळण्याची दाट शक्यता आहे. रवींद्र पाटील यांनी २०१९ मध्ये आमदार चव्हाण यांच्यासाठी निवडणूक प्रचारामध्ये हिरिरीने भाग घेतला होता. त्यामुळे सभापतिपदाचा अनुभव लक्षात घेता वेळेवर पाटील यांचाही विचार होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT