Sugar Cane
Sugar Cane Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : ऊस गाळपात बारामती अॅग्रोची आघाडी

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : गेल्या महिन्यापासून उन्हाचा पारा वाढला आहे. उसाच्या हंगाम (Sugarcane Season) अंतिम टप्यात आला आहे. या हंगामात प्रचंड ऊस उत्पादनाचा सामना जिल्ह्यातील सतरा कारखान्यांना करावा लागत आहे. तीन कारखाने वगळता इतर सर्व कारखाने दहा लाख टनाच्या आत गाळप केले आहेत.

काहींनी हा आकडा ओलांडला आहे, तर जिल्ह्यात सर्वाधिक १६ लाख टनांचे गाळप बारामती ॲग्रोने (Baramati Agro) करून आघाडी घेतली आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यात या वर्षी १०० लाख टन ऊस गाळपाचा आकडा कारखान्यांनी फेब्रुवारीमध्येच ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र असल्याने ऊस तोडणी वर प्रतिकूल परिणाम होत आहे.

अशाही स्थितीत कारखान्यांनी जोमाने गाळप हंगाम सुरू ठेवला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील काही कारखाने एप्रिलच्या १५ तारखेपर्यंत चालतील अशी परिस्थिती आहे. परंतु, सध्या अवकाळी पावसाचे अडथळे येत असल्याने गाळप हंगाम काहीसा धिमागतीने सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात सोमेश्वर साखर कारखाना व भीमा शंकर या कारखान्यांनी साखर उताऱ्यात आघाडी घेतली असून गाळप हंगामात ऊस गाळपामध्ये मात्र बारामती अॅग्रो कारखान्याने आघाडी घेतली आहे.

बारामती अॅग्रो या साखर कारखान्याने १६ लाख ४१ हजार ५४० टन उसाचे गाळप केले आहे. तर सोमेश्वर कारखान्याने १२ लाख ११ हजार ३२३ टन,  माळेगाव कारखान्याने १२ लाख ७ हजार ६० टन उसाचे गाळप केले आहे.

दौंड शुगर साखर कारखान्याने ९ लाख ८७ हजार ८५० टन, भीमा शंकर ९ लाख ८ हजार ३१० टन, श्री छत्रपती कारखान्याने ८ लाख ९५ हजार ६९ टन, तर विघ्नहर साखर कारखान्याने ८ लाख ५६ हजार ९६० टन, कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याने ७ लाख १७ हजार ९५१ टन उसाचे गाळप केले आहे.

उर्वरित भीमा, राजगड, श्री. संत तुकाराम, घोडगंगा, नीरा भीमा, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज, व्यंकटेशकृपा, पराग अॅग्रो या कारखान्यांनी ऊस गाळप हे सहा लाखाच्या आतमध्ये आहेत.  

पुणे जिल्ह्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असून सध्याच्या ऊस हा खोडवा ऊस असल्याने यामध्ये चांगलीच घट येऊ शकते, असे मत शेतकी अधिकारी यांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारी, मार्च पासून जसजशी उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे तसे मजूर उसाच्या तोडणीसाठी काणाडोळा करू लागले आहेत.

हा साखर हंगाम सुरू होण्यापूर्वीच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ऊस तोडणीसाठी कोणत्याही मजुरांना पैसे देऊ नका, जर मजुरांनी पैसे घेतले तर कारवाई करू असा इशारा दिला होता. मात्र, या इशाऱ्याला ऊसतोड मजुरांनी जुमानलेले नाही.

हा आदेश धाब्यावर बसवून सगळीकडे ऊसतोडवाल्याकडून ऊस उत्पादकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे.

- यंदा सुरू झालेले साखर कारखाने - १७
- दैनंदिन गाळप क्षमता ९१ हजार २५० टन


- आत्तापर्यंत १२४ लाख ४३ हजार ७५१ टन उसाचे गाळप
- साखरेचे १२३ लाख ३९ हजार ५५८ क्विंटलचे उत्पादन
- साखर उतारा सरासरी ९.९२ टक्के
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Katol APMC : उच्च न्यायालयाची पणनमंत्र्यांना नोटीस

Pesticide Use : कीडनाशकांच्या अतिवापराविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका

Crate Production : अमरावती जिल्हा झाला क्रेट उत्पादनाचे हब

Crop Damage : श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT