Loan Agrowon
ताज्या बातम्या

Employment Scheme : नामंजूर कर्जप्रकरणे पुन्हा बँकांनी विचारात घ्यावीत

रोजगारनिर्मितीसाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना राज्य शासनाची आहे. यासाठी बँकेकडून कर्ज मंजूर होणे आवश्यक आहे. मात्र, कर्ज न मिळाल्याने अनेकांना आपला रोजगार सुरू करता आलेला नाही.

Team Agrowon

यवतमाळ : मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजने (Chief Minister's Employment Generation Scheme)अंतर्गत अनेक प्रकरणे बँकांनी नामंजूर केली होती. नामंजूर प्रकरणे पुन्हा बँकांनी विचारात घ्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी बँकांना दिले आहेत.

रोजगारनिर्मितीसाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना राज्य शासनाची आहे. यासाठी बँकेकडून कर्ज मंजूर होणे आवश्यक आहे. मात्र, कर्ज न मिळाल्याने अनेकांना आपला रोजगार सुरू करता आलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने या योजनेला गती देण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत; पुढाकार घेत बँकर्स समितीची बैठक घेतली होती. त्यात बँकांना मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिलेत. शिवाय, जी प्रकरणे बँकांनी नाकारली आहेत, ते पुन्हा विचारात घ्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या आहेत.

जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत योजना राबविली जात आहे. बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी राज्य शासनाने योजना सुरू केली आहे.

मात्र, अनेक प्रकरणे बँकेकडून नाकारण्यात आली आहेत. त्यामुळेच आता जिल्हाधिकारी स्वत: अ‍ॅक्शन मोडवर आले असून, कर्जप्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत सीबीलमुळे नामंजूर झालेले कर्ज प्रकरण वगळता इतर सर्व अर्जदारांनी बँकेस संपूर्ण कागदपत्रांसह भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले आहे.

यासंबंधी काही अडचण आल्यास जिल्हा उद्योग केंद्र व खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT