Banana Cultivation  Agrowon
ताज्या बातम्या

Banana Cultivation : खानदेशात कांदेबाग केळीची लागवड स्थिर

खानदेशात कांदेबाग केळीची लागवड पूर्ण झाली आहे. अनेकांनी यंदा उतिसंवर्धित रोपांची लागवड केली आहे. ही लागवड सुमारे नऊ हजार हेक्टरवर स्थिर आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची लागवड (Banana Cultivation) पूर्ण झाली आहे. अनेकांनी यंदा उतिसंवर्धित रोपांची लागवड (Banana Platation) केली आहे. ही लागवड सुमारे नऊ हजार हेक्टरवर स्थिर आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कांदेबाग केली लागवड आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये ही लागवड केली जाते.

या केळीची लागवड जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, यावल या भागांत केली जाते. अलीकडे रावेर, मुक्ताईनगरातही काही शेतकरी कांदेबाग केळीकडे वळले आहेत. मागील हंगामात दर्जेदार कांदेबाग केळीस कमाल २००० रुपये दर निर्यातदार कंपन्यांनी एक क्विंटलसाठी दिला होता.

दर चांगले होते. तसेच यंदाही दर चांगले मिळाले. यामुळे लागवड वाढेल, असा अंदाज होता. परंतु शेतकऱ्यांनी खर्च कमी करून दर्जेदार केळी उत्पादनाला पसंती दिली आहे. यामुळे क्षेत्र वाढलेले नाही. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर कांदेबाग केळी पीक आहे. नंदुरबारात तळोदा, अक्कलकुवा व शहादा तालुक्यांत काही शेतकऱ्यांनीच कांदेबाग केळी पीक घेतले आहे.

पीक सध्या जोमात आहे. रोपांची लागवडही बऱ्यापैकी आहे. १४, १५ रुपये प्रति केळीरोप, असे दर शेतकऱ्यांना पडले. मध्य प्रदेश व जळगाव जिल्ह्यातूनही रोपांची खरेदी करण्यात आली. पिकात एकदा आंतरमशागत, तणनियंत्रणाचे काम झाले आहे. तसेच खतांचा बेसल डोसही दिला जात आहेत. सप्टेंबरमधील बागेला दोनदा बेसल डोस शेतकऱ्यांनी दिला आहे.

कलिंगडाच्या आंतरपिकातून खर्चाचे नियोजन

जळगाव, चोपडा, जामनेरात या केळीत कलिंगडाचे आंतरपीकही शेतकरी साध्य करीत आहेत. यातून केळी लागवड, रोपे, खतांचा खर्च मिळवून घेण्याचे नियोजन आहे. थंडी वाढत आहे. यामुळे कांदेबाग केळी पिकाची अधिकची काळजी घ्यावी लागत आहे. रात्रीच्या वेळेस पाणी, खत व्यवस्थापन, बागेभोवती शेकोट्या आदी कामे शेतकरी करीत आहेत.

लागवडीसाठी कंदांचाही उपयोग

काही शेतकऱ्यांनी कंदांचा उपयोगही लागवडीसाठी केला आहे. त्यासाठी जामनेरातील तोंडापूर, रावेर, औरंगाबादमधील कन्नड, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागातूनही कंद आणले आहेत. प्रतिकंद तीन ते चार रुपये, असे दर मोजावे लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT