Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation : कडेगाव कालव्याची दुरवस्था

कडेगाव लघु पाटबंधारे तलावाअंतर्गत येणाऱ्या कडेगाव कालव्याची दुरवस्था झाली आहे. त्याची तत्काळ स्वच्छता व डागडुजी करावी, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे.

टीम ॲग्रोवन

कडेगाव, जि. सांगली ः कडेगाव लघु पाटबंधारे तलावाअंतर्गत येणाऱ्या कडेगाव कालव्याची (Kadegaon Canal) दुरवस्था झाली आहे. त्याची तत्काळ स्वच्छता व डागडुजी करावी, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे. येथील लघु पाटबंधारे तलावातून कॅनॉलच्या माध्यमातून पाणी कडेगाव व कडेपूर येथील शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांना दिले जाते.

कडेगाव व कडेपूर येथील ४१२ हेक्टर एवढे या कालव्याचे लाभक्षेत्र आहे; तर येथील शेतकऱ्यांना पाणी देण्याचे सर्व नियोजन टेंभू योजनेच्या कडेपूर कार्यालयाकडून केले जाते. तर कडेगाव हद्दीमध्ये हा कालवा म्हणजे जणू डंपिंग ग्राऊंडच झाला आहे. येथे कालव्यामध्ये सर्वत्र कचरा पहायला मिळत आहे.

झाडे वाढली आहेत. तसेच कालव्याचे अस्तरीकरण केले गेले नसल्याने अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. काही ठिकाणी दारे निकामी झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. यामुळे या कालव्याअंतर्गत असलेले संपूर्ण लाभक्षेत्र ओलिताखाली येत नाही; केवळ अंशतः लाभक्षेत्र पाण्याखाली येत आहे. उर्वरित लाभक्षेत्र हे आजही तहानलेलेच आहे.

सध्या रब्बी हंगामासाठी कॅनॉलमधून पाणी सोडावे, अशी मागणी कडेगाव व कडेपूर येथील शेतकरी वर्गातून होत आहे. परंतु त्याआधी टेंभू योजनेच्या माध्यमातून या कालव्याची स्वच्छता व डागडुजी करावी व तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

बंदिस्त कालव्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

कडेगाव हद्दीमध्ये कॅनॉल बंदिस्त करण्यासाठी जलसंपदा विभाग व कडेगाव नगरपंचायत यांच्या संयुक्त माध्यमातून प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी पाठवण्यात आला आहे. परंतु तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हे काम पूर्णत्वास आल्यास शेतकऱ्यांना बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहणार

Manmad APMC : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतराच्या हालचाली

Humani Pest Outbreak : मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप

Farmer Loan Waiver : व्याजमाफी करून मुदलाचे हप्ते करून द्या

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

SCROLL FOR NEXT