ताज्या बातम्या

APMC Election Result : बच्चू कडूंचे चांदूर बाजार बाजार समितीवर वर्चस्‍व, सभापतीपदी राजेंद्र याऊल

Bachchu Kadu Latest News : माजी मंत्री आमदार बच्‍चू कडू यांना चांदूर बाजार कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत वर्चस्‍व राखण्‍यात यश मिळाले आहे.

Team Agrowon

Chandur Market Committee News : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी वर्चस्व मिळवले आहे. त्यांच्या गटातील राजेंद्र याऊल यांची सभापती तर गजेंद्र गायकी यांची उपसभापती पदी निवड झाली.

चांदूर बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू आणि कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख यांच्या गटात लढत झाली. देशमुख यांनी चांगलीच कंबर कसली होती. पण बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ने बाजी मारली. बच्चू कडूंच्या शेतकरी पॅनलने १८ पैकी १६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. दोन अपक्षांनी या निवडणुकीमध्ये बाजी मारली.

माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीने एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर सभापती आणि उपसभापतीही त्याच पक्षाचा होणार, हे त्यावेळीच स्पष्ट झाले होते. काल राजेंद्र याऊल यांची सभापती तर गजेंद्र गायकी यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farming : दर्जेदार तांदूळ उत्पादनात नाव कमावलेले आमळी

Maharashtra Development : लक्षात घ्या विकसित महाराष्ट्रासमोरील आव्हाने

Trump Trade Tariffs : अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीमुळे कापड, कोळंबी, सोयापेंडला फटका

Malegaon Blast : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Animal Husbandry : पशुपालकांना वीज, कर, व्याज सवलत

SCROLL FOR NEXT