Climate Control
Climate Control Agrowon
ताज्या बातम्या

Climate Control : स्वयंचलित हवामान यंत्र नोंदीवर प्रश्नचिन्ह

टीम ॲग्रोवन

जालना : जिल्ह्यातील म्हसला येथे बसविण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान यंत्र चुकीच्या जागी बसविल्याचे सांगत त्यामधील नोंदीवर शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सोमवार (ता. २६) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, दाभाडी मंडळाचे स्वयंचलित हवामान केंद्र म्हसला येथे बसविले आहे. ते चुकीच्या ठिकाणी बसविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तीने ६० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले असताना त्यावर व्यवस्थित नोंद येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने नुकसान होऊनही फळपिकांचा पीकविमा मिळालेला नसल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याने बदनापूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करून सर्व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याचे निर्देश देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या प्रश्नावर न्यायासाठी याआधी रास्ता रोको, तहसील कार्यालय समोर आंदोलन करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे सोमवार (ता. २६) पासून आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. जोवर न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे. उपोषणाला कारभारी म्हसलेकर, ज्ञानेश्वर म्हसलेकर, रामभाऊ म्हसलेकर, रावसाहेब म्हसलेकर बसले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT