Chatrapati Sambhaji Nagar Agrowon
ताज्या बातम्या

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव मंजूर

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अनुक्रमे संभाजीनगर (Chatrapti Sambhaji nagar) आणि धाराशिव (Dharashiv) असे करण्यात यावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत होती.

Team Agrowon

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मांडलेल्या औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नामांतर करण्याच्या ठरावास विधानसभेने आज एकमताने मंजुरी दिली. त्याबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या शिवाय नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावही मंजुर करण्यात आला.

आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई यांच्या नामांतराचा ठराव मंजूर करण्यात आला. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव तर मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असे करण्यात आले, या नावांना आज मंजूरी देण्यात आली.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अनुक्रमे संभाजीनगर (Chatrapti Sambhaji nagar) आणि धाराशिव (Dharashiv) असे करण्यात यावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत होती. मागील सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो ठराव मंजूर केला होता. पण, नव्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तो ठराव रद्द केला हेाता. त्यानंतर या सरकारने पुन्हा तो ठराव केला होता. तो आज विधानसभेत मांडून मंजूर करून घेतला.

दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचे ठराव मंजूर झाल्यानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही एक सूचना केली. ते म्हणाले की, दि. बा. पाटील विमानतळाच्या नावाचा आज ठराव झाला आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचाही ठराव दोन वर्षापूर्वी झाला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सरकारने या ठरावांसोबत त्याचाही पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर ते नावही देण्यात यावं. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबाबत तातडीने पाठपुरावा करण्यात येईल, असे उत्तर दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT