Gokul Milk Kolhapur Agrowon
ताज्या बातम्या

Gokul Milk Kolhapur : गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांना धक्का! लेखापरीक्षण होणार? उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघाने दाखल केलेल्या या याचिकेवर काल (ता.२८) सुनावणी होऊन न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

Team Agrowon

Kolhapur Jilha Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) सत्तांतर झाल्यानंतर अनेक प्रकरणांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी केला होता.

याबाबत त्यांनी दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने संघाचे चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देऊन त्याची जबाबदारी सोलापूरच्या उपनिबंधकांकडे दिली होती.

पण लेखापरीक्षणासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना संघाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप झाला. त्यानंतर संघाने या लेखापरीक्षणाला स्थगिती मिळावी म्हणून थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने या कारवाईला खो बसला होता.

संघाने दाखल केलेल्या या याचिकेवर काल (ता.२८) सुनावणी होऊन न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयाने संघाच्या लेखापरीक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून ही कारवाई तातडीने होण्यासाठी आता विरोधकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या निर्णयानंतर संघाचे लेखापरीक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत उच्च न्यायालयाकडून रात्री उशिरा निकाल दिला आहे.

लेखापरीक्षणाचा आदेश देण्याचा दुग्ध विभागाला अधिकार नसल्याने कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी मागणी 'गोकुळ'कडून करण्यात आली होती. त्यावर, गेले चार महिने सुनावणी सुरू होती. तक्रारी नजर अंदाज करता येणार नाहीत, त्यामुळे चौकशीला स्थगिती देता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितल्याने गोकुळमधील सत्ताधाऱ्यांना तगडा झटका बसल्याचे बोलले जात आहे.

याबाबत गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे म्हणाले की न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. दुग्ध विकास विभागाने सुरु केलेल्या चौकशीला स्थगिती मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती. सोमवारी ती फेटाळण्यात आली असल्याचे डोंगळे यांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून मिळाली शाश्‍वती

Livestock Management: उत्तम आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्राधान्य

Poultry Farming: देशी कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन

Tomato Onion Prices: आंध्र प्रदेशात कांदा, टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; टोमॅटो फेकून देण्याची वेळ

Farm Productivity: उत्पादकता वाढली तर भाव पडतील?

SCROLL FOR NEXT