Onion Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : धुळे बाजार समितीत कांद्याची आवक वाढली

येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या तीन-चार दिवसांपासून कांद्याची मोठी आवक सुरू आहे. सरासरी सोळाशे ते दोन हजार रुपये व सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे.

टीम ॲग्रोवन

धुळे, ता. १६ ः येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या तीन-चार दिवसांपासून कांद्याची मोठी आवक (Onion Arrival) सुरू आहे. सरासरी सोळाशे ते दोन हजार रुपये व सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल (Onion Rate) असा मिळत आहे.

जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विक्रीसाठीचा ओघ वाढला आहे. किरकोळ बाजारात कांदा सरासरी २५ ते ३० रुपये प्रतिकिलोने विक्रीस आहे. जिल्ह्यातून बाजार समितीत नवीन काढणी केलेल्या कांद्याची मोठी आवक होत आहे. उन्हाळ कांद्याची आवक संपली आहे.

स्थानिक परिसरातील नव्या काढणी केलेल्या कांद्याची आवक सध्या सुरू आहे. कांद्याचे उत्पादन कमी होत असले तरी दर वाढत आहे. या वर्षी ढगाळ हवामानाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. कांद्याची काढणी सुरू झाल्याने आवक वाढणार आहे. कांद्याचे भाव वाढले तरी कांद्याचा उत्पादन खर्च वसूल होत नाही, अशी उत्पादकांची तक्रार आहे.

प्रतिकूल हवामानामुळे कांद्याचे नुकसान होते. चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागला आहे. तसेच ढगाळ वातावरण आणि मध्येच झालेल्या पावसामुळे कांदाचाळीमध्ये खराब होत आहे. त्यात कांदा सडू लागला असल्याने बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी (ता. १६) लिलावात क्रमांक एकच्या कांद्यास दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

मध्यम कांद्यास एक हजार सहाशे ते एक हजार आठशे, जोडकांद्यास एक हजार तीनशे ते दीड हजाराचा दर मिळाला. पहाटेपासून टेम्पो, ट्रॅक्टर, रिक्षांनी कांद्याची आवक सुरू झाल्याचे दिसून आले. कांद्याच्या दरात अजूनही अपेक्षित वाढ नसल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करत आहेत. साक्री तालुक्यातूनही येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. शेतकरी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Roads: शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक

Agro Processing Industry: कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्याची गरज: संचालक सतीश मराठे

Pune APMC: पुणे बाजार समिती गैरव्यवहार चौकशी समितीमधून वगळा

Delhi Flood: यमुनेच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ

Mung Urid Threshing: मूग, उडदाचे मळणीतील नुकसान कमी करण्यासाठी ४ सोप्या टीप्स

SCROLL FOR NEXT