Onion Market : कांद्याचे बाजारभाव दबावातच

Anil Jadhao 

कांद्याचे दर अद्यापही दबावात आहेत. राज्य आणि देशातील महत्वाच्या बाजारसमित्यांधील दर कमीच आहेत.

बाजारात आवक वाढल्यानं दर नरमल्याचं व्यापारी सांगतात. कांद्याची आवक जास्त असल्याचंही व्यापारी सांगतात.

सध्या कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार २०० ते १ हजार ७०० रुपये दर मिळतोय.

खरं तर  यंदा राज्यात कांद्याची लागवड कमी होती, असं शेतकरी सांगत होते.

बाजारात पुरवठा मर्यादीत होऊन दर सुधारण्याचा अंदाज होता. मात्र सध्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत आहे.

पण पुढील काळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.

cta image
क्लिक करा