Electricity Bills  Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Bills : चालू वीजबिलांसह ५३५ कोटी रुपयांची थकबाकी

नांदेड जिल्ह्यातील थकबाकीदार ग्राहकांना वसुलीसाठी महावितरणचे आवाहन

Team Agrowon

नांदेड : ‘वंदेमातरम, मी महावितरणमधून बोलतोय, आपण आपले वीजबिल (electricity bills) भरले आहे का, नसेल भरले तर कृपया लवकर भरा,’ असे विनम्र आवाहन करणारे फोन वीजग्राहकांना महावितरणचे कर्मचारी सध्या करीत आहेत. वीजग्राहकांनी केंद्रात किंवा ऑनलाइनच्या विविध पर्यायांचा वापर करत बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरोनाच्या संक्रमण काळात वसुली ठप्प झाल्याने महावितरणने वीजबिल वसुलीसाठी प्रत्येक वीजग्राहकाला फोन करून वीजबिल भरण्याचे आवाहन केले होते. नांदेड परिमंडळात नोव्हेंबर २०२२ अखेर लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांकडे डिसेंबरच्या बिलासह तब्ब्ल ५३५ कोटी ७८ लाख रुपये थकले आहेत. आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील ग्राहकांनी सहा कोटी ९२ लाख, परभणी जिल्ह्यातील ग्राहकांनी ११ कोटी ५४ लाख तसेच नांदेड जिल्ह्यातील ग्राहकांनी ३१ कोटी ६६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. वीजदेयक वसुलीमध्ये नांदेड परिमंडळ सर्वांत मागे आहे. डिसेंबर महिना संपत आला तरी वीजबिल वसुली पन्नास टक्क्यांवर गेलेली नाही.

५३५ कोटी ७८ लाखांची थकबाकी
हिंगोली जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे ३८ कोटी ३३ लाख रुपये, परभणी जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे ३५१ कोटी ५६ लाख रुपये तर नांदेड जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे १४५ कोटी ८८ लाख रुपये थकीत आहेत. परिमंडळातील घरगुती ग्राहकांकडे डिसेंबरच्या बिलासह ४५९ कोटी ३५ लाख रुपये, व्यावसायिक ग्राहकांकडे ३२ कोटी ५५ लाख रुपये तर औद्योगिक ग्राहकांकडे ४३ कोटी ८६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Dispute Resolution: पोलिसांच्या पुढाकाराने रस्त्यांचे १०४ वाद मिटले

Bird Flu: दीड हजार कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’

Banana Crop Care : उन्हाळ्यात केळी बागेचे नुकसान टाळण्यासाठी ५ उपाय!

Sangli District Bank: सांगली जिल्हा बॅंकेच्या शताब्दी वर्षात ठेवी १० हजार कोटी करणार

Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध

SCROLL FOR NEXT