Dhule News Agrowon
ताज्या बातम्या

Dhule News : धुळ्यात मुख्य प्रशासकीय संकुलास मान्यता

Team Agrowon

Dhule News : पाठपुराव्याअंती राज्य शासनाने धुळे शहरातील सर्व शासकीय कार्यालये (Government Offices) एकाच छताखाली येण्यासाठी सादर केलेल्या मुख्य प्रशासकीय संकुलासंबंधी (Admiration Building) प्रस्तावास मान्यता दिली. त्यासाठी ४५ कोटींच्या निधीलाही मंजुरी दिली.

शहरातील जमनागिरी रोडलगत शासकीय धान्य गुदामासमोरील सरकारी जागेत मुख्य प्रशासकीय संकुल साकारणार आहे.

मंत्रालयात धुळे मुख्यालयी साकारणाऱ्या नियोजित मुख्य प्रशासकीय संकुलाचे रेखाचित्र आणि याआधारे प्रेझेंटेशन करण्यात आले. धुळे मुख्यालयी असलेली असंख्य शासकीय कार्यालये भाड्याच्या जागेत आणि विखुरलेल्या स्वरूपात आहेत.

त्यामुळे संबंधित नागरिकांना त्या-त्या कार्यालयांतर्गत शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो की काही अडीअडचणी असो ते कार्यालय शोधण्यापासून त्रास, हेलपाटे सुरू होतात. त्यात वेळ, पैसे खर्च होतात.

ते लक्षात घेऊन एकाच जागेत जिल्हाधिकारी कार्यालयापासून सर्वच अन्य शासकीय कार्यालये असावीत, अशी मागणी शासनाकडे केली.

त्यासाठी संकुलाचे रेखाचित्र बनवून या प्रस्तावास मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू केला. त्याचे प्रेझेंटेशन झाल्यावर राज्य शासनाने प्रस्तावास मान्यता दिल्याची, तसेच याकामी ४५ कोटींना मंजुरीही देण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात ४२ कोटी...

शासनाकडे पाठपुराव्याअंती सादर करण्यात आलेल्या धुळे शहरातील विविध विकासकामांच्या मागणीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात एकूण ४२ कोटींच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तसे पत्र शासनाकडून देण्यात आल्याची माहितीही आमदार शाह यांनी दिली.

जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नवीन मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी नऊ कोटी रुपये, दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेच्या परिसरात ग्रंथालय इमारत व आवार भिंतीच्या बांधकामासाठी ११ कोटी ६४ लाख रुपये, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी वैद्यकीय अधिकारी व वसतिगृह बांधकामासाठी १२ कोटी ४ लाख रुपये, आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानासह एकूण ४२ कोटींच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT