Meeting Agrowon
ताज्या बातम्या

Krishna Valley : कृष्णा खोरे फ्लड डायवर्षण प्रोजेक्टला तत्वत: मान्यता ; दुष्काळी भागातील कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न मिटणार

Flood Diversion Project : महाराष्ट्र सरकारने कृष्णा खोरे फ्लड डायवर्षण प्रोजेक्टला तत्वत: मान्यता दिली आहे. या योजनेमुळे पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठा फायदा होऊ शकतो. भविष्यात दुष्काळी भागातील कायमस्वरुपी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

Team Agrowon

Devendra Fadanvis : पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचे महापूराचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला वळण्याबाबत कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेची अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. राज्य सरकारने या महत्वकांक्षी कृष्णा खोरे फ्लड डायवर्षण प्रोजेक्टला तत्वत: मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील महापूराच्या पाण्याचा दुष्काळी दुष्काळग्रस्त भागाला उपयोग होणार आहे.

कृष्णा खोऱ्यातील सातारा, सांगली कोल्हापुर या जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी व पुराचे वाहुन जाणारे पाणी हे सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक झाली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजी पाटील, बबनराव शिंदे, जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर, कार्यकारी संचालक अतुल कपाले, अधिक्षक अभियंता कुमार पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत कृष्णा-भीमा नदी जोड प्रकल्प कामाचे सर्वेक्षण करण्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास बैठकीत मान्यता दिली. या प्रकल्पामुळे १.२५ लाख हेक्टर जमिनीला शेतीसाठी पाणी मिळेल. पिण्याच्या पाण्याची सोय होईल. तसेच पूरनियंत्रण करता येईल. १५ हजार कोटी किमतीच्या या प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून (ADB) अर्थसहाय्य घेण्याचा निर्णय केला.

या प्रकल्पाचा अंदाजे २० हजार कोटी रुपयांचा असून त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद तातडीने करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. या योजनेमुळे सातारा, सोलापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागासह मराठवाड्याला या योजनेमुळे पाणी मिळू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT