Crop Competition
Crop Competition Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Crop Competition : रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा

टीम ॲग्रोवन

अकोला : पिकांची उत्पादकता (Crop Productivity) वाढ व शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी कृषी आयुक्तालयामार्फत (Agriculture Commissionerate) रब्बी पीक स्पर्धेचे (Rabi Crop Competition) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच रब्बी पिकांची निवड करण्यात आली असून, स्पर्धेकरिता शनिवार (ता. ३१) पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्या‍साठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते. त्यामुळे ते अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडण्यास मदत होईल. हा उद्देश ठेवून कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येते.

स्पर्धेतील पिके व अटी शर्ती

रब्बी पिके : ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस असे एकूण पाच पिके आहेत. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकांचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान एक हजार हेक्टर असावे. तथापि, संबंधित पिकाखालील क्षेत्र एक हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकांसाठी स्वतंत्र) तीनशे रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान १० व आदिवासी गटासाठी किमान पाच यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पीकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल.

विजेत्या शेतकऱ्यांना बक्षीस

पीक स्पर्धेत विजेते ठरलेल्या सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावर पहिले पारितोषिक पाच हजार रुपये, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये व तिसरे पारितोषिक दोन हजार रुपये. जिल्हास्तरावरील विजेत्यांसाठी पहिले पारितोषिक १० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये व तिसरे पारितोषिक पाच हजार रुपये आणि राज्यस्तरावरील विजेत्यांसाठी पहिले पारितोषिक ५० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ४० हजार रुपये व तिसरे पारितोषिक ३० हजार रुपये मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT