Kanchan Vijesekra Agrowon
ताज्या बातम्या

इंधन साठवणूक थांबवण्याचे आवाहन

पेट्रोल घेऊन आलेले एक जहाज २८ मार्चपासून श्रीलंकेच्या सागरात उभे असल्याचे ऊर्जामंत्री कांचन विजेसेकरा यांनी संसदेला सांगितले. परंतु पेट्रोलच्या जहाजाचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे परकीय चलन नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

कोलंबो : गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या श्रीलंकेने त्यांच्याकडे पेट्रोल खरेदीसाठी पैसे नसल्याचे बुधवारी उघडपणे कबूल केले आहे. तसेच श्रीलंकन सरकारने नागरिकांना इंधनासाठी तासंतास रांगेत उभे न राहण्याचे आवाहनही केले आहे.

पेट्रोल घेऊन आलेले एक जहाज २८ मार्चपासून श्रीलंकेच्या सागरात उभे असल्याचे ऊर्जामंत्री कांचन विजेसेकरा यांनी संसदेला सांगितले. परंतु पेट्रोलच्या जहाजाचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे परकीय चलन नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पेट्रोलच्या शिपमेंटसाठी पैसे नाहीत

ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकेरा यांनी संसदेत सांगितले की, पेट्रोलसह एक जहाज २८ मार्चपासून श्रीलंकेच्या सागरात अभे आहे. परंतु, सरकारकडे पेट्रोलच्या या जहाजाचे पैसे देण्यासाठी परकीय चलन नाही. जानेवारी २०२२ मध्ये आलेल्या शेवटच्या शिपमेंटसाठी आधीच USD ५३ दशलक्ष कर्ज घतल्याचेही त्यांनी या वेळी संसदेत सांगितल.

संबंधित शिपिंग कंपनीने दोन्ही देयके पूर्ण होईपर्यंत जहाज सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोलसाठी तासंतास रांगेत उभे राहू नये, अशी विनंतीदेखील विजेसेकेरा यांच्याकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

देशात डिझेलची समस्या नसल्याचे सांगितले. परंतु पेट्रोलचा मर्यादित साठा असून, ते अत्यावश्यक सेवांसाठी, विशेषत: रुग्णवाहिकांसाठी वितरित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

इंधन साठवणूक थांबवण्याचे आवाहन


यासोबतच विजेसेकेरा यांनी लोकांना इंधन साठवणूक बंद करण्याचे आवाहन केले. विजेसेकेरा म्हणाले, की सर्व फिलिंग स्टेशनवर पेट्रोलचे वितरण पूर्ण होण्यास काही दिवस लागतील. मंगळवारी आम्ही देशातील सर्व फिलिंग स्टेशनवर सुपर डिझेल आणि ऑटो डिझेलचे वितरण केल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Long March: मुख्यमंत्र्यांनी घेतली लॉन्ग मार्चच्या मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी; मोर्चेकर्‍यांशी बोलून अंतिम निर्णय, किसान सभेची भूमिका

Sanjay Gandhi National Park: संजय गांधी नॅशनल पार्कमधील अतिक्रमण कारवाई स्थगित; आदिवासींना दिलासा

Jowar Crop Management: ढगाळ हवामानात ज्वारीवर किडींचा वाढता धोका; वेळीच करा नियंत्रण

Ethanol Blending: इथेनॉलमुळे १९.३ अब्ज डॉलर्स परकीय चलनाची बचत, शेतकऱ्यांचाही फायदा : पुरी

India EU FTA Benefit Maharashtra: भारत-युरोपियन युनियन करारामुळे शेतमाल निर्यातीला संधी- मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT