Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्याचे विभागीय ठिकाण असल्यामुळे सहकार विभागाची अनेक कार्यालये छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत. नागरिकांच्या व सहकारी संस्थांच्या सभासदांच्या सोयीसाठी ही संपूर्ण कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे सहकार संकुलाच्या सोईसुविधा युक्त प्रशस्त इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले..मंत्रालयात आयोजित बैठकीला अतिरिक्त आयुक्त नागनाथ इगलेवार, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहनिबंधक संतोष बिडवाई, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, जागतिक बँक प्रकल्प अंतर्गत कार्यरत कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी आदी उपस्थित होते..Mumbai Bank Cooperative Building : मुंबै बँकेच्या सहकार भवनसाठी ‘पशुसंवर्धन’ ऐवजी म्हाडाची जमीन.डॉ. भोयर म्हणाले, की सहकार संकुलाची स्थापत्य विषयक कामे पूर्ण करण्यासाठी गती वाढवावी. या इमारतीमध्ये कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना विविध सोयी सवलती असतील, याची खात्री करावी. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची काम पूर्ण करण्यात यावी. संबंधित कंत्राटदाराने विहित काल मर्यादित काम पूर्ण करावे. काम पूर्ण करण्यामध्ये विलंब लागल्यास खर्च वाढतो. त्यामुळे यंत्रणेने कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्यासाठी दक्षता घ्यावी. कामाला विलंब झाल्यास कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले..सहकार संकुलाची रचनासहकार संकुलामध्ये प्रशासकीय इमारत तळमजला अधिक सात माळ्यांची असून एकूण बांधकाम क्षेत्रफळ १८ हजार ५२४ चौरस मीटर आहे. तसेच निवासी इमारतही सात माळ्यांची आहे. संकुलामध्ये पार्किंगची प्रशस्त व्यवस्था, दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प, चार उद्वाहक, अतिथी गृह, भोजनकक्ष असणार आहे..ही आहेत कार्यालयेया सहकार संकुलात जिल्हा उपनिबंधक, विशेष लेखा परीक्षक वर्ग दोन, सुनावणी हॉल, नोंदणी कक्ष, भांडार कक्ष, कार्यालयीन कर्मचारी कक्ष, विभागीय सहनिबंधक कार्यालय, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (फिरते पथक), तालुका उपनिबंधक, विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन (सहकारी संस्था), प्रादेशिक सहसंचालक (साखर), प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग एक (साखर), द्वितीय विशेष लेखापरीक्षक (साखर), विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (बँक), सहकार न्यायालय, विशेष लेखापरीक्षक (दुग्ध), विशेष लेखा परीक्षक (कापूस)आदी कार्यालये तसेच प्रशिक्षण सभागृह आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.