Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ज्वारी पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. गहू, हरभरा आणि सोबत तीनही हंगामात घेतल्या जाणाऱ्या मका पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. अशाही स्थितीत जिल्ह्यातील चार गावे आवडीने परभणी सुपर मोती या रब्बी ज्वारी वाणाची लागवड करत आहेत..माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सर्वसाधारण ४४ हजार १९८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत केवळ ६० टक्के म्हणजे सुमारे २६ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. त्यातही चार गावे सातत्याने रब्बी ज्वारी पेरणीला प्राधान्य देताना दिसतात..Rabi Jowar Area: तीन जिल्ह्यांत रब्बी ज्वारीचे क्षेत्र घटले.या रब्बी ज्वारी पेरणी करणाऱ्या गावांमध्ये गल्ले बोरगाव, पलसवाडी, आखातवाडा आणि खामगाव या चार गावात कमी अधिक ५०० एकरावर या रब्बीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संशोधित परभणी सुपर मोती या वाणाची पेरणी यंदा शेतकऱ्यांनी केली आहे..Rabi Jowar Sowing: मराठवाड्यात पाच लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी.चारही गावातील रब्बी ज्वारीचे पिकांपैकी काही शेतकऱ्यांची काढणी पंधरा दिवसावर आली आहे. काहीच पीक हुरडा स्थितीत तर काही पोटरी स्थितीत आहे. या हंगामात नोव्हेंबर डिसेंबर जास्त थंडी होती. यामुळे ज्वारी पिकावर अनिष्ट परिणाम दिसून येत होता. परंतु जानेवारीमध्ये थंडीत हळू हळू घट होत गेली आणि ज्वारीचे पीक थंडी कमी झाल्याने या चार गावात चांगलेच बहरले आहे..गल्लेबोरगाव येथील ज्ञानेश्वर माऊली भगत, झुंबरसिंग दुमाले, नवनाथ लवंगे, संतोष चंद्रटिके, किशोर खोसरे, तुळशीराम औटे, तर पळसवाडी येथील कारभारी ठेंगडे, शैलेश औटे,सोपानराव औटे या शेतकऱ्यांनी सध्याची पिकाची अवस्था अत्यंत उत्तम असल्याचे विभागीय कृषी शिक्षण विस्तार केंद्राला कळविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.