Maharashtra News : राज्यातील महसूल आणि वन विभागाकडून तलाठी पदाच्या तब्बल ४६४४ जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी २६ जून २०२३ पासून ऑनलाईन पद्धतीने फार्म भरले जात आहेत.
हा फॉर्म भरण्याची शेवटची मुदत ही १८ जुलै पर्यंत होती परंतु सर्व्हर डाऊनमुळे अनेकांना यापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. दरम्यान शासनाकडून याची पुन्हा तारीख वाढवून. २५ जुलै २०२३ पर्यंत फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाल्याने दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्याबाबत निवेदन शासन स्तरावर प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तलाठी भरतीकामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती राज्य परिक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.
रोहित पवार यांनी केली होती मागणी
वेबसाईट हँग होत असल्याने काल अखेरच्या दिवशी असंख्य युवकांना तलाठी भरतीचे फॉर्म भरता आले नाहीत. त्यासाठी फॉर्म भरण्यास १५-२० दिवस मुदतवाढ देण्याचा मुद्दा रोहित पवार यांनी विधानसभेत मांडत सरकारचं याकडे लक्ष वेधले होते.
यासंदर्भात मा. महसूलमंत्र्यांना विनंती केल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. असे ट्विट करत रोहित पवार यांनी व्हिडिओही शेअर केला आहे. दरम्यान, या पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे.
तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
दरम्यान तलाठी भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड (Aadhar card), जातीचा दाखला (Caste certificate) फोटो, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, संबंधित पदवीचे मार्कशीट, 10 वी 12 वी मार्कशीट, डाव्या हाताचा अंगठा ठसा या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.