Ashok Chavan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : आता तरी शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा

अशोक चव्हाण यांची राज्य सरकारकडे मागणी

टीम ॲग्रोवन

नांदेड : परतीच्या पावसाने (Heavy Rainfall) राज्यात ठिकठिकाणी कहर केला आहे. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीतून कसेबसे वाचलेले पीकही उद्ध्वस्त (Crop Damage) झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर मोठे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने किमान आतातरी सरसकट भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे.

मागील आठवड्याभरात राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने उच्छाद मांडला. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी शेतात पाणी साचले. काढणीला आलेली पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. ठिकठिकाणांवरून शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती येत असून, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

नांदेड जिल्ह्यातील नुकसानीबाबत चव्हाण म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सोयाबीनसारखे प्रमुख पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. कापसाची बोंडे पिवळी तर ज्वारी काळी पडली आहे. कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या केळीचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा पीकविमा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. विमा कंपन्यांनी भरपाईची अग्रिम रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा व असंतोष निर्माण झाला आहे. या भयावह परिस्थितीची राज्य सरकारने दखल घेऊन तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT