Highway Project Opposition by affected Villages: प्रस्तावित कल्याण-लातूर जनकल्याण महामार्गामुळे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता जुन्नर तालुक्यातील बाधित गावांमधून तीव्र विरोध सुरू झाला आहे. शेती, घरे आणि व्यवसाय वाचवण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून, कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ न देण्याचा एकमुखी निर्धार त्यांनी केला आहे..या महामार्गाच्या प्रश्नावर पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी (ता. ३०) कोळवाडी येथे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मंदाकिनी दांगट, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, भाजपा नेते भगवान घोलप, बापूसाहेब कुमकर, सूरज वाजगे, सुभाष घोलप, पोपट राक्षे, रोहिदास गोडे, नितीन घोलप यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, शेतकरी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. .Farmers Oppose Highway Work: ‘समृद्धी’च्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध.महामार्गासाठी जमीन संपादन झाल्यास अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे होतील, शेती व्यवसाय धोक्यात येईल आणि स्थानिक बाजारपेठांचे अर्थकारण कोलमडेल, अशी भीती उपस्थितांनी व्यक्त केली. बाधित गावांना एकत्र करून शासनाकडे हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला..आम्हाला हा महामार्ग नकोच. या महामार्गाची गरज नाही. शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना देशोधडीला लावून सरकारला नेमका कोणाचा विकास करायचा आहे, असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे..Land Acquisition Protest: रिंग रोडच्या निर्णयाविरोधात स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांचा एल्गार.बैठकीतील महत्त्वाचे निर्णयराजकीय मतभेद बाजूला सारून सर्वपक्षीय एकजुटीने लढा उभारणार.बाधित गावांमध्ये व्यापक जनजागृती करून नागरिकांना संघटित करणार.महामार्ग रद्द करण्याची मागणी शासनाकडे ठामपणे मांडणार.मागणी मान्य न झाल्यास जुन्नर तालुक्यात तीव्र जनआंदोलन उभारणार.महामार्गामुळे बाधित होणारी प्रमुख गावेसीतेवाडी, बगाडवाडी, पांगरी तर्फे मढ, तळेरान, मढ, वाटखळ, कोळवाडी, पिंपळगाव जोगा, डिंगोरे, मांदारणे, उदापूर, अहिनवेवाडी, रोहोकडी आणि ओतूर..महामार्ग नकोच या भूमिकेवर सर्वपक्षीय नेते, ग्रामपंचायत पदाधिकारी, शेतकरी, व्यावसायिक आणि ग्रामस्थ एकत्र आल्याने जुन्नर तालुक्यातील हा प्रश्न आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात या महामार्गाच्या विरोधात जुन्नर तालुक्यात मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.बापूसाहेब कुमकर, संतप्त ग्रामस्थ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.