Agriculture Inputs Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Inputs : निविष्ठा कंपन्यांच्या मनमानी दरवाढीमुळे द्राक्ष उत्पादकांत रोष

Team Agrowon

Nashik News : सप्टेंबरपासून द्राक्ष बागांच्या फळ छाटण्यांचा हंगाम सुरू झाला आहे. एकीकडे हंगामात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. असे असताना काही निविष्ठा उत्पादक व पुरवठादार कंपन्यांनी कीटकनाशकांच्या किमती २० ते २५ टक्के वाढविल्या आहेत.त्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.

तर देशातील व परदेशातील कंपन्यांच्या मनमानी दरवाढीविरोधात शेतकरी वर्गात संतापाची लाट आहे. त्यामुळे कृषी निविष्ठांचे दर नियंत्रण हा मुद्दा अधोरेखित झाला आहे.

द्राक्ष बागांसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या वाढविलेल्या किमतीबाबत विचार विनियम करून ठोस भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने संचालक मंडळाची व शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमातून काही कंपन्यांनी वाढविलेल्या दराबाबत शेतकरी व संचालक यांनी आक्षेप नोंदविण्यात आला. तर कंपन्यांच्या मनमानीवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

एकीकडे शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीत नियोजनात व्यस्त असताना कोणत्याही ठोस कारणाशिवाय उत्पादनांचे दर काही कंपन्यांनी मनमानी पद्धतीने वाढविले आहेत. पार पडलेल्या बैठकीत काही कंपनी प्रतिनिधीमार्फत त्यांच्या कंपनीसोबत संपर्क साधला असता त्यांना दर वाढीबाबत कोणतेही ठोस स्पष्टीकरण देता आले नाही.

अडचणीच्या काळात पुन्हा आर्थिक कोंडी

मागील २ वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे ओढावलेली परिस्थिती तसेच अवकाळी पाऊस व गारपीट, वाढलेला द्राक्ष उत्पादन खर्च व त्यात उत्पादन खर्चाखाली शेतीमालाला मिळणारा भाव यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे हित गृहीत धरून इतर परिणामकारक पर्यायी दर्जात्मक खते व कीटकनाशकांची उपलब्धता निविष्ठा केंद्रांत करून द्यावी व शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघातर्फे सर्व कृषीनिविष्ठा विक्रेत्यांना करण्यात आले आहे. यासंबंधी कृषी विभाग व नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशन यांना पत्र पाठवून यासंबंधी कळवले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

Agriculture Processing : केळी चिप्स, हळद पावडरीचा ‘जटाशंकर’ ब्रॅण्ड

Sweet Potato : नवरात्रीला ‘शाहूवाडी’ रताळ्यांचा गोडवा

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

SCROLL FOR NEXT