Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविम्यासाठी शेतकरी करणार मुंडण आंदोलन

उघड्या डोळ्यांनी नुकसानीचा अंदाज येत असताना देखील पीक विमा कंपनीकडून भरपाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत या विरोधात मुंडण आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अखिल भारतीय तांडा सुधार समिती पुसदच्या वतीने देण्यात आला आहे.

Team Agrowon

यवतमाळ ः अतिवृष्टी (Heavy Rainfall), संततधार पाऊस तसेच पूरस्थितीमुळे पुसद तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उघड्या डोळ्यांनी नुकसानीचा अंदाज येत असताना देखील पीक विमा (Crop Insurance) कंपनीकडून भरपाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत या विरोधात मुंडण आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अखिल भारतीय तांडा सुधार समिती पुसदच्या वतीने देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनातून हा इशारा देण्यात आला आहे. निवेदनानुसार, कृषी विभागाकडून हंगामात पीकविमा संदर्भाने जागृती केली जाते. त्याच्या परिणामी हजार शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र विमा संरक्षित केले. त्याकरिता निर्धारित विमा हप्ता देखील भरण्यात आला.

जिल्ह्याच्या इतर तालुक्‍याप्रमाणे पुसद तालुक्‍यात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान पावसामुळे झाले. मात्र याची दखल विमा कंपनीने घेतली नाही. विमा कंपनीकडून मात्र शासनाने भरपाई दिल्यानंतरही विमा परताव्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप तांडा सुधार समितीकडून करण्यात आला आहे. या प्रश्‍नी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पवन राठोड, पंडित पवार, दुर्गाराम महाराज, सुभाष राठोड, शैलेश सरगर, कुबिरराव मस्के, अविनाश राठोड, साहेबराव हाके, गजानन राठोड व इतरांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील ५ दिवस पाऊस कमी राहणार

Subsidy Fraud: अनुदान अपहारप्रकरणी सात कर्मचारी बडतर्फ 

Jal Jeevan Mission: सरकारकडून निधी न आल्याने ‘जलजीवन’ची बिले थकली

Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरू

Farmer Loan Waiver : 'पंतप्रधानांशिवाय देवा भाऊचं पानही हालत नाही...'; कॉंग्रेस खासदाराने संसदेत केली कर्जमाफीची मागणी

SCROLL FOR NEXT