Andolan Agrowon
ताज्या बातम्या

Andolan : मुळा’त उड्या घेणाऱ्या शेतकरी आंदोलकांवर गुन्हे

नुकसानीची मदत मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन

Team Agrowon

नगर ः दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून मदत मिळत नसल्याने बुधवारी (ता. २१) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना, राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मुळा धरणात उड्या घेत आंदोलन
केले. तर काहींना उड्या घेण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पकडले. आंदोलन करणाऱ्या १३ कार्यकर्त्यांवर राहुरीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यात दोन-तीन महिन्यांपूर्वी जोरदार पाऊस, अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पंचनामे केले, परंतु अजूनही मदत दिलेली नाही. त्यामुळे बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी मुळा धरणावर जाऊन धरणात उड्या मारुन आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी धाव घेत आंदोलकांना पकडले. पोलिसांनी या वेळी आंदोलन करणाऱ्या १३ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, भागवत निमसे, राहुल चोथे, अब्दुल हमीद राजमहंमद पटेल, विजय शिरसाट, प्रशांत शिंदे, विशाल तारडे, कैलास शेळके, सुनील शेलार, मीनानाथ पाचरणे, सुभाष चोथे, विठ्ठल सूर्यवंशी या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांना नंतर जामीन देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Prices: केंद्राच्या धोरणांचा कांदा उत्पादकांना २०२५ वर्षात फटका, कर्जबाजारीपणा वाढला, कांदा उत्पादक संघटनेचा गंभीर आरोप

Chiaseed Price: वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन चियासीडला २२ हजारांचा उच्चांकी दर

Sugarcane Fodder: उसाचा चारा उपलब्ध होण्यास खानदेशात सुरुवात

Best Woman Farmer Award: सुवर्णा गावंडे यांना शारदाबाई पवार पुरस्कार प्रदान

Harvesting Automation: पीक काढणी यंत्रातील संवेदके, प्रणाली

SCROLL FOR NEXT