Onion Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Onion Crop Damage : पावसात भिजलेला कांदा दहा दिवसांत सडला

शेतकऱ्याने ‘जेसीबी’द्वारे उकिरड्यात गाडला

Team Agrowon

Onion Crop Damage वडगाव पिंगळा (ता. सिन्नर) येथील युवा शेतकरी सागर मुठाळ यांचा दहा दिवसांपूर्वी काढलेला उन्हाळी कांदा खळ्यावर (Onion Crop Damage) सडला. सडलेला हा कांदा जेसीबीच्या साह्याने उकांड्यात गाडण्याची वेळ सिन्नरच्या कांदा उत्पादकांवर आली आहे.

फेब्रुवारीपासून वादळी पावसाने रब्बी हंगाम नेस्तनाबूत केला. त्या वेळी काढणी आलेला गहू गारांच्या तडाख्यात सापडला. काही गव्हाचा रंग गेला, तर काही गहू ओले काढल्याने शेती खळ्यावर उबट झाले.

त्यात सध्या सिन्नर तालुक्यात उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र वादळी पावसाने कांद्याच्या पातीत पाणी गेले. त्यामुळे देठापासून कांदा सडण्यास सुरुवात झाली आहे.

वडगाव पिंगळ्याचे युवा शेतकरी सागर मुठाळ यांनी दहा दिवसांपूर्वी चार ट्रॅक्टर उन्हाळ कांदा शेतीतून काढला. त्यात उत्पादनात घट झाली. मात्र निराश न होता त्यांनी कांदा साठवणुकीचा निर्णय घेतला. ‘नाफेड’ने कांदा खरेदी सुरू केली की दर वाढतील, अशी आशा बाळगून कांदा खळ्यावर आणला.

पण वादळी पावसाने कांद्याचे नुकसान केले. मुठाळ परिवाराने खळ्यावर सडलेला कांदा जेसीबीच्या साह्याने उकिरड्यात गाडण्याचा निर्णय घेतला. पाणावले डोळ्यांनी मुठाळ यांनी चार ट्रॅक्टर कांदा उकिरड्यात गाडला.

काढून ठेवलेला कांदा दहा दिवसांत सडला. मार्चमध्ये वादळी पाऊस झाला. त्याने कांद्याच्या गाभ्यात पाणी शिरले. त्यामुळे कांदा सडला. जेसीबीद्वारे चार ट्रॅक्टर कांदा उकिरड्यात गाडला आहे.
- सागर मुठाळ, शेतकरी, वडगाव पिंगळा, जि. नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Prices: 'रब्बी'तही खतांची चिंता! युरिया, 'डीएपी' १० ते १५ टक्क्यांनी महागणार; कारण काय?

Mid Day Meal: चार महिन्यांपासून इंधन, भाजीपाल्याचे अनुदान थकित

NABARD Insurance: शेतपिकांसह आता दूध उत्पादन, मत्स्यपालन क्षेत्रालाही विमा संरक्षण, काय आहे 'नाबार्ड'ची नवीन योजना

PM Kisan 21st Installment: पीएम किसानचा २१ वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट, 'या' शेतकऱ्यांना २ हजार मिळणार नाहीत

Panchayatraj Abhiyaan: महाश्रमदान मोहिमेत राबले हजारो हात!

SCROLL FOR NEXT