Bamboo Farming Agrowon
ताज्या बातम्या

Bamboo Farming : ‘बांबू लागवड यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा’

Bamboo Cultivation : कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या बाजूने बांबूची लागवड केल्यास धरणामध्ये येणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत बांबू लागवड अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मनरेगाचे मिशन महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बांबू लागवड अभियान मार्गदर्शन कार्यशाळा पा पडली. त्यावेळी श्री. वर्मा यांनी या सूचना केल्या.

यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी विजय यादव, राजेंद्र शहा, संजीव कर्पे यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, वन व कृषी विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. वर्मा म्हणाले, ‘‘बांबू पिकाचा समावेश आता गवत वर्गीय वनस्पतीमध्ये करण्यात आला आहे.

त्यामुळे आता बांबूची तोडणी ही करता येते व ते जाळताही येतात. तसेच नवीन धोरणानुसार आता औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये किमान ६० टक्के जैविक इंधनाचा वापर बंधनकारक करण्यात येत आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये बांबूची मागणी वाढणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. यंत्रणांनी शेतकऱ्यांना याचे फायदे समजावून सांगण्यासाठी काम करावे,’’ असेही त्यांनी सांगितले.

श्री. पटेल म्हणाले, ‘‘बांबूचे बेट तयार होते. त्याला तंतूमुळे असते त्यामुळे जमिनीची धूप थांबवण्यास त्याचा फयदा होतो. कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या बाजूने बांबूची लागवड केल्यास धरणामध्ये येणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी बांबू लागवड हा एक चांगला पर्याय आहे.’’श्री. डुडी म्हणाले, ‘‘ वर्षभरात त्याविषयीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल. दर आठवड्याला आढावा घेतला जाईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT