Cultivation Of Mulberry Agrowon
ताज्या बातम्या

Mulberry Cultivation : मराठवाड्यात २००० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट

महारेशीम अभियान २०२२ च्या माध्यमातून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात २००० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : महारेशीम अभियान २०२२ (Mahareshim Mission) च्या माध्यमातून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात २००० एकरांवर तुती लागवडीचे (Mulberry Cultivation) उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही रेशीम उद्योग (Silk Industry) आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना साथ दिल्याने मराठवाड्यात रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे.

शिवाय मराठवाड्यातील कोषांना राज्यातील विविध बाजारपेठांसह रामनगरमच्या बाजारातही मोठी मागणी असते. महारेशीम अभियान २०२२ अंतर्गत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व बीड या चारही जिल्ह्यात प्रत्येकी ३०० एकरावर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

याशिवाय परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २०० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला १०० एकरांचा लक्ष्यांक देण्यात आला असून, प्रत्येक कर्मचाऱ्यांना १००० शेतकरी भेटीचा लक्ष्यांकही देण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ गाव भेटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

महरेशीम अभियानात रेशीम, महसूल, ग्रामपंचायत, केंद्रीय रेशीम मंडळ, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, बार्टी, कृषी विज्ञान केंद्र, पोकरा सहाय्यक, महावीम आदी सहभागी असणार आहेत. हे अभियान राबविण्यासाठी कर्मचारी यांनी स्वतः प्रस्तावना करणे, कार्यक्रमाचा उद्देश सांगणे, रेशीम उद्योगाच्या माहितीसाठी अनुभवी शेतकरी बोलावणे, त्यांच्या मानधन व प्रवास भत्त्याची व्यवस्था करणे, रेशीम उद्योग, तुती, काडी, कोष व मार्केटसंबंधी माहिती देणे,

उत्सुक शेतकरी यांची यादी फोन नंबरसह तयार करणे, अभियान व्यवस्थित राबविले जाते आहे की नाही, याचा जिल्हाप्रमुखांनी व वरिष्ठ तांत्रिक सहायकांनी अहवाल घेणे, केलेल्या कामाचा सात दिवसानंतर आढावा घेऊन प्रादेशिक कार्यालयाला कळविणे, प्रादेशिक कार्यालयाने मार्गदर्शन करणे, तांत्रिक माहिती जास्त न देणे, इतर पिकांसोबत तुलना करणे, दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन करणे, पोकराचे गावात मनरेगा योजनेची माहिती न देणे आदी कृती करणे आवश्यक असल्याचे रेशीम विभागाकडून कळविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT