MSRTC  Agrowon
ताज्या बातम्या

MSRTC : एसटी महामंडळाची दिवाळी झाली गोड

एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने दिवाळीनिमित्त १० दिवस जादा बसचे नियोजन केले होते. या १० दिवसांत महामंडळाने आठ कोटी ९५ लाख ८८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले.

टीम ॲग्रोवन

नगर : एसटी महामंडळाच्या (MSRTC) अहमदनगर विभागाने दिवाळीनिमित्त १० दिवस जादा बसचे नियोजन केले होते. या १० दिवसांत महामंडळाने आठ कोटी ९५ लाख ८८ हजार रुपयांचे उत्पन्न (MSRTC Income) मिळविले. कोविड व एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच एसटी महामंडळाला मोठे उत्पन्न मिळविता आले.

कोविड संकटकाळानंतरची ही पहिलीच खुली दिवाळी असल्याने नागरिकांनी ती उत्साहात साजरी केली. दिवाळीच्या सुट्ट्यांत गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. गर्दी पाहता, विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिवाळीतील दहा दिवसांच्या वाहतुकीचे नियोजन केले. त्यानुसार २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ९५ जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. या बसगाड्यांनी २३ लाख किलोमीटरचा प्रवास केला.

सुरक्षित प्रवासासाठी अनेकांनी एसटी महामंडळालाच प्राधान्य दिले. त्यामुळे एसटी बसना तोबा गर्दी होती. २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्याने अनेकांनी प्रवास टाळला. तो दिवस वगळता उर्वरित ९ दिवसांत बस स्थानकांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वाढती गर्दी पाहता, विभाग नियंत्रक सपकाळ स्वतः बस स्थानकात बसून होत्या.

त्यांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणखी जादा बसचे नियोजन केले होते. या गर्दीचा सकारात्मक परिणाम एसटीच्या उत्पन्न वाढण्यात झाला आहे. बुधवारी (ता. ९) शाळा सुरू होणार असल्याने, आपापल्या गावी गेलेले चाकरमाने आता शहरात परतू लागले आहेत. त्यामुळे बसना गर्दी आहे. मात्र दोन ते तीन दिवसांत ती ओसरणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे यात्रा बसगाड्या सुरू करण्याचा निर्णय झाला असून, शनिवारी (ता. १२) अष्टविनायक यात्रेसाठी बस निघणार आहे.

ऐन दिवाळीत गर्दी असूनही प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासावर विश्‍वास ठेवला. कमी गाड्या असूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त फेऱ्या केल्या. त्यामुळे कोविड कालावधीनंतर महामंडळाला चांगले उत्पन्न मिळू शकले.
मनीषा सपकाळ, विभाग नियंत्रक, एसटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT