FPC Conference
FPC Conference Agrowon
ताज्या बातम्या

‘ॲग्रोवन एफपीसी महापरिषदे’चे पुण्यात २ सप्टेंबरला आयोजन

टीम ॲग्रोवन

पुणे ः ‘ॲग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद’ (FPC Conference) (एफपीसी लिडरशीप कॉन्क्लेव्ह) येत्या दोन सप्टेंबरला पुण्यात होत असून केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. एक दिवसाच्या या महापरिषदेस राज्यातील आघाडीच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे निमंत्रित प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

‘सकाळ अॅग्रोवन’ने आयोजित केलेल्या या पहिल्याच एकदिवसीय महापरिषदेत निवडक २५० एफपीसींना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड महापरिषदेचे टायटल स्पॉन्सरर तर पॉवर्ड बाय म्हणून इस्राईल केमिकल लिमिटेड सहभागी होत आहेत. तसेच वर्डेशियन, बँक ऑफ महाराष्ट्र, स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज् लिमिटेड, फिनोलेक्स प्लासॉन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलाइजर्स लिमिटेड या नामांकित संस्था सहप्रायोजक आहेत.

राज्यातील सरपंचांना प्रशिक्षण व त्यांच्या समस्यांवर चर्चा घडवून आणणारा ‘सरपंच महापरिषद’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम ‘अॅग्रोवन’कडून गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबविला जात आहे. त्यामुळे ग्रामविकासाला वेगळी दिशा मिळाली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या चळवळीला समृद्ध करण्यासाठी आता ‘शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद’ ही अभिनव संकल्पना ‘अॅग्रोवन’ कडून राबवली जाते आहे. त्यानिमित्ताने शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकमेकांशी जोडले जाईल. दोन्ही घटकांच्या अपेक्षा आणि संधी याविषयी परिषदेतील चर्चेत भर दिला जाणार आहे. याशिवाय कृषी उद्योगातील कंपन्या व यंत्रणांमधील वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी या विचारमंथनात सहभागी होत आहेत. त्यांचे अभ्यासपूर्ण विचार ऐकण्याची संधी शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींना या महापरिषदेमुळे मिळणार आहे.

महापरिषदेच्या दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमांत कृषिमाल निर्यातीबरोबरच राज्यातील सहकार, दुग्धव्यवसाय विकास, कृषीनिविष्ठा, सिंचन व वित्तविषयक सेवांबाबत राज्यातील नामांकित तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर फळे-भाजीपाल्यासह, धान्ये, प्रक्रियायुक्त पदार्थांच्या ऑनलाइन सुविधा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारीही शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबद्दल माहिती देतील. एफपीसींमधील नेतृत्वाचा विकास, व्यवसाय व बाजारपेठांमधील आव्हाने आदी विषयांवर विविध तज्ज्ञ महापरिषदेत मार्गदर्शन करतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT