Agro Industrial Park Agrowon
ताज्या बातम्या

Agro Industrial Park : नाशिकमध्ये आयटीसह अॅग्रो इंडस्ट्रीयल पार्क

जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याने येथील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

Team Agrowon

नाशिक : जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याने येथील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच येणाऱ्या काळात नाशिक येथे आयटी व ॲग्रो इंडस्ट्रीयल पार्क (Agro Industrial Park) उभारण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

अंबड रेक्रीएशन सेंटर येथे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) व सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित यांच्या अडीअडचणींबाबत रविवारी (ता. ४) आयोजित आढावा बैठकीत सामंत बोलत होते. या वेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, एमआयडीसी मुख्य व्यवस्थापक नितीन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, मुख्य समन्वयक धनंजय बेळे, सल्लागार समिती ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस ललित बुब यांच्यासह विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामंत म्हणाले, की जिल्ह्यात सुरुवातीला १०० एकरमध्ये आयटी क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे कृषीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांना विकसित करण्यासाठी नाशिकमध्ये आयटी व ॲग्रो इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यासाठी शासनामार्फत मदत करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात डाटा सेंटरचा मोठा प्रकल्प लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पाणी, वीज व रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी दर महिन्याला जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांनी जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत बैठकांचे आयोजन करण्यात यावे. ज्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल.

एमआयडीसीमधील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘अमृत-२’ या योजनेतून उपाययोजना करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे येथे आकारण्यात येणाऱ्या घरपट्टीत झालेली वाढ लक्षात घेता त्याबाबत आवश्यक निर्णय घेऊन औद्योगिक क्षेत्रासाठी असणाऱ्या नियमानुसार त्यावर योग्य निर्णय महानगरपालिकेने घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Genetic Editing Varieties : आयसीएआरने केले २४ पिकांमध्ये जनुकीय संपादन; भाताच्या दोन सुधारित वाण विकसित, लोकसभेत सरकारने दिली माहिती

Agriculture Budget: शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा, संशोधन पदे तातडीने भरा, संसदीय समितीची सरकारला शिफारस

Local Body Elections: ग्रा.पं.वर प्रशासकाचे सावट!

Citrus Symposium 2025: जैन हिल्स येथे रविवारपासून  लिंबूवर्गीय शेतीविषयी मंथन

Water Scarcity: नांदी गावात हिवाळ्यातच पाणीटंचाई

SCROLL FOR NEXT