Rabi Season Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Season : कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने रब्बी हंगाम यशस्वी करावा

Latest Agriculture News : जूनपासून पाऊस कमी असल्याने रब्बीचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. आगामी दिवसांत पावसाची शाश्‍वती तेवढी राहिलेली नाही.

Team Agrowon

Nagar News : ‘‘जूनपासून पाऊस कमी असल्याने रब्बीचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. आगामी दिवसांत पावसाची शाश्‍वती तेवढी राहिलेली नाही. धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी आहे.

भविष्याकरिता पिण्यासाठी पाणी राखीव ठेवावे लागेल. या पार्श्‍वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन करताना विविध रब्बी पीक पद्धतींचा अवलंब करावा लागेल,’’ असे कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात अनुपकुमार यांनी आढावा घेतला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विद्यापीठाचे नियंत्रक सदाशिव पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘‘विद्यापीठाने स्थापनेपासून आजपर्यंत २८६ विविध पिकांचे वाण, १७७४ शिफारशी व ४४ कृषी यंत्रे शेतकऱ्यांसाठी प्रसारित केलेली आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही विद्यापीठ संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यामध्ये प्रभावी पद्धतीने काम करीत आहे.’’

संशोधन उपसंचालक डॉ. बाळासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ यांनी आभार मानले.

‘चाऱ्याचे नियोजन गरजेचे’

‘‘जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने समन्वय साधून काम केल्यास विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात रब्बी हंगामाचे नियोजन व्यवस्थित होऊन रब्बी हंगाम यशस्वी होईल,’’ असे अनुपकुमार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT