Indrayani River Pollution Agrowon
ताज्या बातम्या

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीकाठची शेती धोक्यात

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील विविध उद्योगातील रसायनयुक्‍त सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत मिसळले जाते. त्यामुळे नदी प्रदूषित झाली असून नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले.

टीम ॲग्रोवन

कुरुळी, जि. पुणे ः पिंपरी-चिंचवड औद्योगिक (PCMC Industrial Estate) नगरीतील विविध उद्योगातील रसायनयुक्‍त सांडपाणी (Wast Water) थेट इंद्रायणी नदीत (Indrayani River) मिसळले जाते. त्यामुळे नदी प्रदूषित (Indrayani River Pollution) झाली असून नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले. गेल्या काही महिन्यांपासून रासायनिक मिश्रणाने इंद्रायणी नदी वारंवार फेसाळली जात आहे. परिणामी दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चालल्याने जलचर प्राण्यांना फटका बसत आहे. तसेच नदीकाठची शेती प्रदूषित पाण्यामुळे धोक्‍यात आली आहे.

परिसरातील आळंदीसह नदीकाठच्या गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उद्योगनगरीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून प्रकल्प उभारले आहेत. उभारलेले प्रकल्प चालवण्यासाठी वर्षाला कोट्यवधीचा खर्च केला जातो. तरीही सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी तसेच नदीत सोडले जात असल्याने नदीला गटाराचे स्वरुप आले आहे. विशेष म्हणजे वारंवार प्रशासनाकडे इंद्रायणी प्रदूषण मुक्‍त करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

महापालिका हद्दीतील चिखली, मोशी, तळवडे भागातून सध्या मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. लाखो लिटर दूषित पाणी नदीत मिसळले गेल्याने चिंबळी-मोशी हद्दीतील नदीपात्रात उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी इंद्रायणीत सध्या जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते.

बंधाऱ्याखाली रसायनयुक्त पाण्यामुळे पाण्यावर पांढऱ्या रंगाचा फेस तयार होत आहे. महापालिका हद्दीतून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करत नाही, अशी स्थिती आहे. परिसरातील व्यवसायाचे रसायन मिश्रित सांडपाणी बंद होऊन इंद्रायणी पूर्ववत कशी होईल याकडे सध्या कोणाचेच लक्ष नाही. स्थानिक पिंपरी चिंचवड महापालिकाही पूर्णपणे हतबल आणि निष्क्रिय असल्याचे चित्र असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पिंपरी महापालिकेच्या हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यावर गेल्या दोन महिन्यांपासून फेस तरंगत आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला.

माणसाने पृथ्वी, आकाश, पाताळ सगळीकडे काहूर माजवले आहे आणि त्याला अपवाद नद्या तरी कशा असणार? शहरीकरण वाढत असल्याने सांडपाणी आणि उद्योगांचे रासायनिक पाणी वाहून येत असल्यामुळे इंद्रायणी नदीची अवस्था अतिशय प्रदूषित झालेली आहे.
आतिश बारणे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Karjmafi : कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांचां उद्रेक होईल; डॉ. अजित नवलेंचा सरकारला इशारा

Indian Politics: किसमें कितना है दम!

Cotton Market : कापसाचे उत्पादन घटूनही भाव दबावात का?

Parliament Monsoon Session : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात कॉँग्रेसचे सरकारला आठ प्रश्न

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

SCROLL FOR NEXT