Agricultural Festival Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural Festival : बीड येथे कृषी महोत्सवास सुरवात

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने हा महोत्सव आयोजित केला आहे.

Team Agrowon

Beed News : कृषी विभागामार्फत (Agricultural Department) आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवास शुक्रवारी (ता. २४) सुरवात करण्यात आली. २८ फेब्रुवारी पर्यंत महोत्सव चालणार आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग (Agriculture Department) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने हा महोत्सव आयोजित केला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर व प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे यांचे सनियंत्रणाखाली छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राउंड), छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे.

शुक्रवारी महोत्सवाचे उद्घाटन बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, माजी आमदार साहेबराव दरेकर, अक्षय मुंदडा, सर्जेराव तांदळे, सलीम जहांगीर, प्रगतशील शेतकरी दिलीप गोरे, अशोक लोढा, देविदास नागरगोजे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेचा समाज व्यवस्थेचा कणा आहे शेतकरी धान्य पिकून लोकांना जगवितो त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रती शासन संवेदनशील आहे. या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्यास मदत होईल.
डॉ. प्रीतम मुंडे, खासदार, बीड
आधुनिक शेतीने उत्पन्नात वाढ होईल शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेता येतो.
दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी, बीड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin : ‘लाडकी बहीण’मुळे वित्तीय तूट नाही

Onion Rate Crash : कांद्याचे ट्रॅक्टर थेट कार्यालयासमोर आणून निषेध

Traditional Fisherman : पांरपरिक मच्छीमारांची मालवण येथील कार्यालयावर धडक

Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

SCROLL FOR NEXT