Sorghum Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Millet Cultivation : ‘कृषी’चा ज्वारी, बाजरी लागवडीवर ‘फोकस’

यवतमाळ जिल्ह्यात पूर्वी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. आता ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, ज्वारी तसेच बाजरीची लागवड वाढावी, या साठी यंदा पुढाकार घेतला जाईल.

Team Agrowon

यवतमाळ : २०२३ हे पौष्टिक तृणधान्य (Millet Year) वर्ष घोषित केले आहे. त्यामुळे कृषी विभागाने (Agricultural Department) ज्वारी (Jowar), बाजरी (Pearl Millet) तसेच नाचणी (Ragi Cultivation) पिकांचे लागवड क्षेत्र वाढावे यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर तृणधान्यांची लागवड करण्यात आली.

पोषक धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने अपेडा या कृषी निर्यात प्रोत्साहन संस्थेच्या माध्यमातून भारतीय भरडधान्यांच्या निर्यातीला जगभर प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार केले आहे.

यात नाचणी, ज्वारी व बाजरी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यांत ज्वारी, बाजरी, राजगिरा आदी पिके घेतली जातात. यातील ज्वारी, बाजरी ही पिके खरीप व रब्बी दोन्ही हंगामांत येतात.

जिल्ह्यात पूर्वी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. आता ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, ज्वारी तसेच बाजरीची लागवड वाढावी, या साठी यंदा पुढाकार घेतला जाईल.

विदर्भ हा दुष्काळी पट्टा असल्यामुळे व पुरेशा सिंचन सुविधा नाही. त्यांचा हंगामी पिकांवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिक भर हा हंगामी पिकांवर असतो.

पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्‍यांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. भरडधान्यातील पोषणमूल्ये व आहारातील महत्त्व पटवून देत देश-परदेशात बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या साठीही प्रयत्न केले जात आहेत.

यंदा जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर तृणधान्यांची लागवड केली होती. यात वाढ होण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्‍यांना प्रोत्साहन देणार आहे.

शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतल्यास बाजारात तृणधान्याला चांगला भाव मिळू शकतो. जिल्ह्यातील तृणधान्यांची सरासरी लागवड तीन हजार हेक्टरवर आहे. यात ज्वारी, बाजरी, मका आदींचा समावेश आहे. यंदा लागवड क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील.
नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT